1. इतर

कमाईची नवी संधी- छतावर बसवा सौर पॅनल, कमवा पैसे

KJ Maharashtra
KJ Maharashtra
solar pannel

solar pannel

देशातील विविध संकटाला सामोरे जाणारे क्षेत्र लक्षात घेऊन केंद्र सरकारने शेतकरी ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान  महाभियान अर्थात कुसुम  या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात सिंचनासाठी वापरले जाणारे सर्व डिझेल व इलेक्ट्रिक पंपाचा वापर घटवण्याची  योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी शेतात सौर पॅनल बसवून त्यातून निर्माण होणारी वीज सिंचनासाठी वापरता येईल याशिवाय त्यातून उत्पादित होणारी वीज घरगुती वापरासाठी देखील काही प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल.

 या योजनेचा दुहेरी फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत आणि पुरेशी वीज मिळण्याबरोबरच अतिरिक्त विज  पॉवर ग्रीडला विकून उत्पन्नदेखील मिळत येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून घरावर सोलर पॅनल बसवून चांगल्या प्रकारे पैसेदेखील कमवता येणार आहेत. याबद्दलची माहिती या लेखात आपण घेणार आहोत.

 कुसुम योजने द्वारे आपण आपल्याकडे असलेल्या रिकाम्या जागेवर अथवा घराच्या छतावर सौर पॅनेल बसवून वीजनिर्मिती करू शकता. हे तयार वीज आपण आपल्या घरगुती वापरासाठी वापरून  ती दुसऱ्याला देखील विकू शकता. कोरोना मुळे  उद्भवलेल्या धकाधकीच्या परिस्थितीत रोजगाराचे एक नवीन संधी म्हणून पीएम कुसुम योजना एक वरदान ठरू शकते. यामध्ये तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सौर पॅनेल बसवून लाखोंची कमाई करू शकता. या योजनेअंतर्गत शेतकरी आणि समाजातील आर्थिक दुर्बल घटकांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवून सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी आपली शेतजमीन भाड्याने देऊन देखील चांगली कमाई करू शकता अथवा सौर पॅनल बसवून त्यातून उत्पादित होणारी वीज विकून नफा मिळू शकतात.

 

 या योजनेअंतर्गत एखादी व्यक्ती सौर पॅनल बसवण्यासाठी आपल्या शेतजमिनीचा एक तृतीयांश भाग भाड्याने देऊ शकतात. या बदल्यात कंपनी शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये भाडे देऊ शकते. तसेच या योजनेअंतर्गत एक एकर जमीन दिल्यास शेतकऱ्यांना एक हजार युनिट मोफत वीज मिळेल. कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कंपनी आणि अर्जदार यांच्यात सौर पॅनल सर्व बसविण्याबाबत आणि भाड्याने देण्यासाठी करार केला जातो. हा करार बहुतांशी पंचवीस वर्ष केला जातो. करा पूर्ण झाल्यानंतर भाडे वाढते. सौर पॅनल बसवण्यासाठी चा संपूर्ण खर्च ही  कंपनी उचलते. जर वैयक्तिक वापरासाठी सौर बॅनर बसवायचे असतील तर सरकार चांगल्या  प्रकारची सूट देते.

 स्त्रोत- प्रभात

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters