1. इतर

पीएम किसान योजना : २.३० लाख शेतकऱ्यांकडून वसूल होणार २०८.५ कोटी रुपये

KJ Staff
KJ Staff


पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत पुढील २००० रुपयांचा  हप्ता डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांच्या  खात्यात येण्याची शक्यता आहे. पण त्याआधी केंद्र आणि राज्य सरकार फसवणूक करणाऱ्या  शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्याची तयारी करत आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेंतर्गत महाराष्ट्रात आयकर भरणाऱ्या  कोट्यावधी शेतकऱ्यांना  वर्षाकाठी ६००० रुपये देण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांची  स्वत: ची जमीन आहे आणि  त्यांनी आयकर भरला नाही, तसेच याचा लाभ या शेतकऱ्यांना मिळणार नाही, ज्यांना मासिक पेन्शन  दहा हजार रुपयांपेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांना ही याचा लाभ मिळणार नाही, हे शेतकऱ्यांना समजवून सांगावे लागेल.  

टीओआयच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील २.३० लाख  कर भरणाऱ्या  शेतकऱ्यांना सन्मान निधीचा मोबदला देण्यात आला आहे. अशा शेतकऱ्यांना  एकूण २०८. ५ कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. आता सरकार जे अपात्र विमा धारक असतील  त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करणार आहे. टीओआयच्या वृत्तानुसार, महाराष्ट्र कृषी जनगणनेचे उपायुक्त विनय कुमार आवट्टे म्हणाले ,जे अपात्र आहेत त्याची अद्याप चौकशी सुरू आहे. 

सातारा जिल्ह्यातील बहुतेक शेतकरी:

आतापर्यंत महाराष्ट्रातील २६४ शेतक्यांनी २४. ८  लाख रुपये परत केले आहेत. जास्तीत जास्त शेतकरी जे यात अपात्र आहेत  ते सातारा जिल्ह्यातील आहेत, येथील १९ हजार २८९ शेतकऱ्यांकडून वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम पुण्याच्या १६ हजार १०१, जळगावच्या १३ हजार ९४२, सोलापूरच्या १३ हजार ७९३, कोल्हापुरातील १३ हजार ०६१ आणि नाशिकमधील १२ हजार ०५४  शेतकर्‍यांकडून वसूल केली जाईल.

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters