तीस दिवसात ३८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आले दोन- दोन हजार रुपये; अशी तपासा आपली स्थिती

05 October 2020 10:54 AM By: भरत भास्कर जाधव


मोदी सरकारची सर्वाधिक लोकप्रिय झालेली पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी पडत आहे.  या योजनेच्या अंतर्गत शेतऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपयांची मदत ही दोन हजार रुपयांच्या हप्त्या द्वारे केली जाते. दरम्यान या योजनेचा सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. काही दिवसांपुर्वी पीएम किसान योजनेच्या साहवा हप्ता देण्यात आला होता. गेल्या ३० दिवसात ३८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील महिन्यापर्यंत साधरण दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे  पाठवले जातील अशी आशा आहे. दरम्यान मागील सप्टेंबर महिन्यात पीएम किसान योजनेसाठी १० कोटी ६५ लाख शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केली आहे.

काय आहे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी असून त्यांना या योजनेतून आर्थिक साहाय्य दिले जाते.  साधारण १४ कोटी शेतकऱ्यांना या योजनेतून निधी दिला जात आहे.  शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ही योजना खूप फायदेशीर आहे.  यातून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची मदत केंद्र सरकारकडून केली जाते. 

हेही वाचा : खोटी माहिती देऊन सरकारी योजनेचा पैसा लाटला का ? होणार शिक्षा

घरी बसून जाणून घ्या लाभार्थ्यांची स्थिती

कोणत्याही राज्यातील शेतकऱी आपल्या घरी बसून पीएम किसान योजनेची माहिती आणि लाभार्थ्यांची स्थिती जाणून घेऊ शकता.  यासाठी खालील पद्धतीने कृती करावी.  सर्वात आधी www.pmkisan.gov.in/ या संकेतस्थळावर जावे.  यावर क्लिक केल्यानंतर होम पेज ओपन होईल.  होम पेजवर Farmer Corner हा पर्याय दिसेल.  यात आपल्याला लाभार्थी स्थिती या पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. यात आपल्याला लाभार्थ्यांची स्थिती ची माहिती मिळेल. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. जर तुम्हाला लाभार्थ्यांची स्थिती पाहायची आहे. तर आपला आधार नंबर, मोबाईल नंबर, आणि बँक खाते क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर आपल्याला लाभार्थ्यांची माहिती मिळेल.

 


स्व:ताची नोंदणी आणि सीएससी शेतकऱ्यांची स्थितीची माहिती

आधी तुम्ही अधिकृत संकेतस्थळ www.pmkisan.gov.in/ यावर जावे. अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर होम पेज ओपन होईल. या होम पेजवर Farmers Corner हा पर्याय दिसेल यात Status of Self Registered/CSC Farmers स्वत: नोंदणी आणि सीएससी च्या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल.  या पेजवर शेतकरी आपले आधार नंबर, इमेज कोड, कॅच्चा कोड यादी गोष्टी भराव्यात.  सर्व माहिती भरल्यानंतर सर्च या बटनवर क्लिक करा. यानंतर आपल्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेची सद्य स्थितीची माहिती मिळेल.

मोबाईल एपच्या मदतीने कसे तपासा सन्मान निधी योजनेची यादी

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य केले जाते. याची माहिती वेळोवेळी शेतकऱ्यांना मिळावी यासाठी केंद्र सरकारने मोबाईल अॅप सुरू केले आहे. या मोबाईल अॅपच्या माध्यमातून तुम्ही पीएम - किसान योजनेची माहिती मिळवू शकता.

पीएम- किसान मोबाईल एप कसे डाऊनलोड करणार

आपल्या Android मोबाईलच्या प्ले स्टोर वर जावे. तेथे सर्च टॅबवर PMKISAN GoI Application ला डाऊनलोड करावे. डाऊनलोड केल्यानंतर अॅप्लीकेशन ओपन करा. ओपन केल्यानंतर एक होम पेज दिसेल. या होम पेजवर आपल्याला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेशी संबंधित सर्व सेवा दिसतील. Check Beneficiary Status , Edit Aadhaar Details , Self Registered Farmer Status , New Farmer registration , About the schem , PM -Kisan Helpline आदि.

PM Kisan installment PM Kisan Yojana pradhanmantri kisan samman nidhi पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी
English Summary: PM Kisan Yojana - In 30 days, 38 lakh farmers received Rs 2000 installment

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.