PM-Kisan Scheme: सहावा हप्ता देण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांना पाठवला महत्त्वाचा संदेश; आपण पाहिला का ?

17 June 2020 04:46 PM By: भरत भास्कर जाधव


पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi scheme) यातून आतापर्यंत  देशातील ९.८५ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. या योजनेतून अल्पभूधारक शेतकऱ्यांना आणि छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य दिले जाते. आर्थिक मदत म्हणून सरकारकडून शेतकऱ्यांना २ हजार रुपये दिले जातात.  दरवर्षी ६००० रूपये थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात देणारी ही देशातील सर्वात मोठी योजना आहे.

दरम्यान या योजनेचा हा सहावा हप्ता आहे, पण या हप्ता पाठविण्यापूर्वी सरकारने लाभार्थ्यांना मोबाईलवर एक संदेश पाठवला आहे.  हा संदेश शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे.  या संदेशामुळे शेतकऱ्यांच्या बऱ्याच अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.सरकारकडून पाठवण्यात आलेल्या संदेशात एक लाभार्थ्यांना एक हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे.  लाभार्थी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून त्यांच्या अर्जाची, खात्याची स्थिती जाणून घेऊ शकतात.  पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे की, प्रिय शेतकरी, आता आपण अर्जाची स्थिती PM-KISAN ची हेल्पलाईन नंबर ०११-२४३००६०६ वर कॉल करू जाणून घेऊ शकता.  नोंदणी झालेल्या आपल्या मोबाईल नंबरवरून आपण थेट संपर्क करू शकता.

या योजनेचा आत्तापर्यंत ९.५४ कोटी शेतकऱ्यांची डाटा पडताळणी झाली आहे. तर १.३ कोटी शेतकऱ्यांना अर्ज करून आणि पोर्टलवर नाव येऊन देखील लाभ मिळालेला नाही.  अशा शेतकऱ्यांना या हेल्पलाईनवर संपर्क करून आपली समस्या मांडता येणार आहे.  पीएम किसान योजनेसंदर्भातील कोणत्याही अडचणी किंवा तक्रारींसाठी शेतकरी ०१२०-६०२५१०९ या दूरध्वनी क्रमांकावरही संपर्क साधू शकतात.  यासह योजनेविषयीची कोणतीही माहिती मेलव्दारेही मागवू शकतात.  यासाठी शेतकऱ्याला pmkisan-ict@gov.in या मेल आयडीवर संपर्क करावा लागेल. 

government PM-Kisan scheme central government PM KISAN Beneficiary पीएम-किसान पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी प्रधान मंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान लाभार्थी केंद्र सरकार
English Summary: PM-Kisan Scheme: government send message to farmer before six installment of scheme

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.