1. इतर

पीएम किसान योजना : आला पाचवा हप्ता ; ३० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आले पैसे , ऑनलाईन तपासा आपले नाव

KJ Maharashtra
KJ Maharashtra


पुणे  - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभऱातील कोट्य़वधी शेतकऱ्यांसाठी अनेक लाभकारी योजना सुरू केल्या आहेत.  या योजनांमध्ये पंतप्रधान किसान योजना खुप महत्त्वाची आहे. दरम्यान या योजनेचा पाचवा हप्ता आला आहे.  यामुळे लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने प्रतिवर्षी सहा हजाराचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यासाठी देशभर नोंदणी अभियान चालविले होते.  त्याचा फायदा आता लॉकडाऊनमध्ये होतो आहे.

प्रधान मंत्री किसान सन्मान योजनेचा जुलै अखरेचा पाचवा हप्ता केंद्र सरकारने जमा केला आहे. यामुळे लॉकडाऊनच्या काळात ३० लाख शेतकऱ्यांना आर्थिक मदत असून त्यांच्या खात्यात ६ हजार कोटी रुपये आले आहेत. राज्यात महसुल व कृषी विभागाकडून संयुक्त प्रयत्नातून अलिकडेच ३० लाख ५४ हजार ८७२ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पाचवा हप्ता मिळाला. यामुळे प्रतिशेतकरी दोन हजाराची रक्कम बँकेत जमा करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, नोंदणीकरूनही खात्यात पैसे जमा न होण्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. अशा शेतकऱ्यांनी स्थानिक जिल्ह्यात आरडीसी अर्थात निवासी उपजिल्हाधिकाऱ्याकडे लेखी तक्रार करणे अपेक्षित आहे.  किसान सन्मान योजनेत राज्यातील बहुतेक गावांमधील खातेदार शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे. नोंदणी बाकी असल्यास किंवा आधीच्या नोंदणीत काही दुरुस्ती असल्यास शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना सामुहिक केंद्र सीएससी चालकांना देण्यात आल्या आहेत. तक्रारी निराकण करण्याचे अधिकार फक्त सराकरी समितीकडे आहेत.

कसे पाहणार ऑनलाईन आपले नाव - यासाठी आपण pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जावे. आपण या योजनेसाठी अर्ज करु इच्छित आहात तर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकता.  दरम्यान सरकारने पंतप्रधान किसान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले आहेत. जर आपल्याला आपले नाव पाहायचे असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने तपासू शकता.  या योजनेतील सर्व लाभार्थ्यांची यादी आपण येथे पाहू शकता. पंतप्रधान किसान सन्मान निधी २०२० ची यादी तपासण्यासाठी pmkisan.gov.in या लिंकवर आपल्याला जावे लागेल.

कशाप्रकारे मिळणार योजनेचा पैसा

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत ६ हजार रुपये तीन टप्प्यात दिले जाते. प्रत्येक टप्प्यात २ हजार रुपये दिले जात असून हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात.  पैसे आपल्या खात्यात आल्याची माहिती मोबाईलवर मेसेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जाते.

कसा करणार योजनेसाठी अर्ज - योजनेची नोंदणी करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. भारत सरकारचे संकेतस्थळ www.pmkisan.gov.in/ वर जाऊन नोंदणी करू शकता.  किंवा https://www.pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx येथे आपण नोंदणी आणि अर्ज भरून आपली नोंदणी करु शकता.  याशिवाय तुम्ही राज्य सरकार द्वारे नियुक्त करण्यात आलेल्या पीएम - योजनेच्या नोडल अधिकाऱ्यासी संपर्क करु शकता. किंवा आपल्याजवळील सामान्य सेवा केंद्रावर जाऊन आपला अर्ज करू शकता.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters