1. इतर

PM Kisan Scheme : खोटी माहिती देऊन फायदा घेणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई

KJ Staff
KJ Staff


अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंदी मोदी यांनी किसान सम्मान निधी योजना ( शेतकरी सन्मान निधी योजना) ची सुरुवात केली आहे.   दरम्यान या योजनेचा लाभ अनेक शेतकरी घेत असून आतापर्यंत ९ कोटी शेतकऱ्यांनी यासाठी रजिस्ट्रेशन केले आहे. देशातील १४.५ कोटी शेतकऱ्यांना या योजनेशी जोडण्याचे लक्ष्य सरकारचे आहे.  या योजनेतून सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षाला ६ हजार रुपये जमा करत असते. ही राशी शेतकऱ्यांना तिन हफ्त्यात मिळते.  सरकारने  ठरविलेल्या नियमांनुसार योजनेचा लाभ शेतकरी घेऊ शकतात.  काही शेतकरी नियमात न बसता खोटी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेत आहेत.  अशा शेतकऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

बँक खात्यातील पैसे परत घेतल्यानंतर होणार शिक्षा

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, जर कोणी चुकीची किंवा खोटी माहिती देऊन या योजनेचा फायदा घेत असेल. आणि नंतर पकडला जाईल तर त्यांच्या खात्यात ट्रांसफर करण्यात आलेले पैस परत घेतले जातील. त्यानंतर फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

या योजनेत न बसणारे शेतकरी

  • शेत जमीन दुसऱ्या कामासाठी वापरणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत.
  • संवैधानिक पदावर असल्यास, म्हणजे भूतकाळात किंवा वर्तमान काळात संवैधानिक पदावर कार्यरत असल्यास ती व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
  • केंद्र किंवा राज्य सरकारमध्ये अधिकरी असल्यास किंवा १० हजार रुपयांपेक्षा अधिकची पेन्शन घेणारे शेतकरी या योजनेचा लाभ नाही घेऊ शकत.
  • डॉक्टर, इंजिनिअर, सीएम, वकील यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • जे शेतकऱी इनकम टॅक्स भरतात ते शेतकरी पण योजनेसाठी अपात्र आहेत.

कसा करणार योजनेसाठी अर्ज - योजनेची नोंदणी करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. भारत सरकारचे संकेतस्थळ www.pmkisan.gov.in/ वर जाऊन नोंदणी करू शकता.  किंवा https://www.pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx येथे आपण नोंदणी आणि अर्ज भरून आपली नोंदणी करु शकता.  याशिवाय तुम्ही राज्य सरकार द्वारे नियुक्त करण्यात आलेल्या पीएम - योजनेच्या नोडल अधिकाऱ्यासी संपर्क करु शकता. किंवा आपल्याजवळील सामान्य सेवा केंद्रावर जाऊन आपला अर्ज करू शकता.

पीएम - किसान (PM Kisan Scheme) योजनेसाठी कोणते कागदपत्र लागतात

  • आधार कार्ड
  • बँक खाते
  • सातबारा उतारा
  • रहिवाशी प्रमाणपत्र

आपली नोंदणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी www.pmkisan.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन आपल्या अर्जाची, देयक आणि इतर तपशीलाचा माहिती वेळोवेळी माहिती घेतली पाहिजे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters