पीक नुकसानीचा दावा होणार लगेच ? पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी ऑनलाईन करा अर्ज

28 April 2020 02:48 PM


शेतकरी मोठ्या मेहनतीने आपली शेती पिकवत असतो. परंतु निसर्गाच्या अनिश्चितीमुळे आणि लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. पाऊस कमी झाला का पिकांचे उत्पादन कमी होत असते. तर कधी अतिवृष्टी झाल्याने पिके पाण्यात वाहून जात असतात. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो. याची दखल घेत केंद्र सरकारने २०१६ मध्ये एक योजना आणली होती, या योजनेचे नाव आहे पीक विमा योजना. या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. जेणेकरून त्यांचे उत्पन्नात एक स्थिरता येईल.  आज आपण या योजनेविषयी आणि अर्ज करण्याची पद्धत जाणून घेऊ.

कसा कराल पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी अर्ज ( PMFBY )

या योजनेच्या लाभासाठी तुम्ही बँकेतून अर्ज करु शकता परंतु बँकेत न जाता तुम्ही आता ऑनलाईनही या योजनेचा लाभ घेऊ शकता.  यासाठी तुम्हाला https://pmfby.gov.in/.In  या संकेतस्थळावर जावे लागेल.

कोणते कागदपत्र लागतात योजनेसाठी

पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी आपल्याला काही कागदपत्रे द्यावी लागतात. पॅन कार्ड, आधार कार्ड, चालक परवाना, मतदान कार्ड, आपला रहिवाशी पुरावा, यासह आपल्या पिकांची माहितीसाठी सरपंचाचे पत्र हवे.  आपल्या जमिनीची माहिती सात बारा उतारा, जर आपण दुसऱ्याची जमीन कसत आहोत तर आपले करार पत्र दाखावे लागते. या सगळ्या कागदपत्रांसह एक बाद केलेला धनादेश द्यावा लागतो.

पीक विम्याचा दावा क्लेम करताना या गोष्टींची काळजी घ्या

जर नैसर्गिक आपत्ती आली तर हंगामानंतर १४ दिवासांनी आपण क्लेम करु शकतो.  या योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त इतर कोणत्याही परिस्थितीत विमा उपलब्ध होणार नाही.  या योजनेत दावा करताना शेतकऱ्यांना दीड टक्के प्रीमियम आणि खरीप पिकासाठी दोन टक्के प्रीमियम भरावा लागतो.  आपण आपल्या पीक विम्याविषयी मोबाईल अॅप द्वारेही माहिती घेऊ शकता.  यासाठी तुम्हाला बजाज अलियान्सचे फार्मामित्र हे मोबाईल अॅप डाऊनलोड करावे लागेल.  यात तुम्हाला हवामानाचा नियमित अंदाज, निवडलेल्या पिकांनुसार सल्ला, पिकांचे बाजारभाव, शेती घडामोडींशी संबंधित बातम्या तसेच बियाणे / माती परीक्षण प्रयोगशाळेसाठी लॅबची माहिती, खत विक्रेते, त्याभोवती कोल्ड स्टोरेजची माहिती मिळेल.

PM Fasal Bima Yojana Apply PM Fasal Bima Farmitra App पंतप्रधान पीक विमा योजना पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज फार्मामित्र अॅप
English Summary: PM Fasal Bima Yojana : How Farmers can Claim Insurance for Crop Loss Instantly? Important Documents, Methods to Apply

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.