1. इतर बातम्या

पंतप्रधान जनधन योजनेच्या अंतर्गत विना कागदपत्र उघडा स्मॉल खाते

पंतप्रधान जनधन योजनेच्या अंतर्गत देशातून ४० कोटी खाती उघडण्यात आली आहेत. या खात्यामध्ये १ लाख २९ हजार ९२९ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


पंतप्रधान जनधन योजनेच्या अंतर्गत देशातून ४० कोटी खाती उघडण्यात आली आहेत. या खात्यामध्ये १ लाख २९ हजार ९२९ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा आहे. मोदी सरकारने ही योजना २०१५ मध्ये सुरु केली होती. देशातील सर्व जण बँकिंग क्षेत्राशी जुडले जावे हा उद्देश या योजनेमागे होता.  सरकारच्या अनेक योजनांची सब्सिडी या खात्यात येत असते. कोरोनाच्या काळात पंतप्रधान मोदींनी जन-धन खातेधारक महिलांना दरमहा ५०० रुपयांची आर्थिक मदत दिली होती. दरम्यान या योजनेच्या अंतर्गत नवी एक सुविधा देण्यात आली आहे.

हेही वाचा : जन धन खातेधारकांना PMJJBY आणि PMSBY योजनेचा लाभ

या योजनेच्या अंतर्गत  तुम्ही स्मॉल खाते उघडू शकतात.  जर आपल्याकडे  कोणत्याच बँकेत खाते नसेल तर आपण अगदी सोप्या पद्धतीने जनधन योजनेशी जोडले जाऊ शकतात. इतकेच नाही तर आपल्याकडे सुरुवातीला जर कमी कागदपत्र असतील तरीही आपण खाते उघडून जन धन योजनेशी जोडले जाऊ शकतात. स्मॉल खात्याचा कालवाधी हा १२ महिन्यांचा असतो यादरम्यान आपल्याला कागदपत्र जमा करावे लागतात. कागदपत्र दिल्यानंतर आपले खाते झिरो बॅलन्स खात्यात रुपांतरीत केले जाईल.

 


स्मॉल खात्याचे काय आहेत फायदे 

जन धन योजनेच्या अंतर्गत उघडण्यात आलेल्या स्मॉल खात्यात तुम्ही वर्षातून १ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करु शकणार नाहीत. म्हणजेच वर्षभरात आपण फक्त १ लाख रुपये शिल्लक या खात्यात ठेवू शकतात. तर  ५० हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम आपण या खात्यात जमा करु शकत नाहीत. यासह या खात्यातून आपण फक्त १० हजार रुपये काढू शकतो.  सरकारकडून येणारी सब्सिडी आणि योजनेचा पैसा हा यात ठेवता येईल किंमा जमा करता येईल.

हेही वाचा : सहा वर्षात जनधन योजने अंतर्गत ४० कोटी लोकांनी उघडली खाती; जाणून घ्या! फायदे

ही रक्कम खात्याच्या मर्यादेत समावेश केला जाणार नाही. जर तुम्हाला स्मॉल खाते हे झिरो बॅलन्स खात्यात रुपांतरीत करायचे असेल तर आपल्याला  Know Your Customer म्हणजे  केवायसीच्या अंतर्गत कागदपत्र जमा करावे लागतील आणि आपले खाते झिरो बॅलन्स खात्यात रुपांतरीत केले जाईल. या खात्यासाठी दोन सेल्फ अटेस्टेड फोटो द्यावे लागतील. आपल्या जवळील कोणत्याही बँकेत हे खाते उघडू शकतात.

English Summary: Open undocumented small account under PM Jandhan Yojana Published on: 15 September 2020, 03:43 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters