1. इतर बातम्या

'आपले सरकार सेवा केंद्र' गावातच खोलून तुम्हीही कमवू शकता लाखों; जाणुन घ्या प्रोसेस

नमस्कार मित्रानो भारतात प्रत्येक व्यक्ती चांगले शिक्षण घेऊन नौकरी करण्याचे किंवा आपला व्यवसाय स्थापन करून आपला उदरनिर्वाह चांगल्या रीतीने चालवण्याचे स्वप्न पाहत असतो. ग्रामीण भागात कामधंध्याचा अभाव असल्याने तसेच कामाचा पाहिजे तेवढा मोबदला मिळत नसल्याने अनेक सुशिक्षित तरुण नौकरीच्या शोधात शहराकडे स्थलांतर करतात. त्यामुळे ग्रामीण भागात स्थलांतर एक मोठी समस्या बनत चालली आहे. त्यामुळे सरकार देखील ह्यागोष्टीसाठी उपाययोजना करत आहे. केंद्र सरकार आत्मनिर्भर भारत ह्या योजनेद्वारे अनेक उपक्रम राबवित आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
aple seva kendra

aple seva kendra

नमस्कार मित्रानो भारतात प्रत्येक व्यक्ती चांगले शिक्षण घेऊन नौकरी करण्याचे किंवा आपला व्यवसाय स्थापन करून आपला उदरनिर्वाह चांगल्या रीतीने चालवण्याचे स्वप्न पाहत असतो. ग्रामीण भागात कामधंध्याचा अभाव असल्याने तसेच कामाचा पाहिजे तेवढा मोबदला मिळत नसल्याने अनेक सुशिक्षित तरुण नौकरीच्या शोधात शहराकडे स्थलांतर करतात. त्यामुळे ग्रामीण भागात स्थलांतर एक मोठी समस्या बनत चालली आहे. त्यामुळे सरकार देखील ह्यागोष्टीसाठी उपाययोजना करत आहे. केंद्र सरकार आत्मनिर्भर भारत ह्या योजनेद्वारे अनेक उपक्रम राबवित आहे.

. आणि गावात राहूनच गावातील युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देत आहे. शासनाच्या अशा अनेक योजना आहेत ज्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना रोजगार मिळेल आणि ग्रामीण भाग चांगला सक्षम बनेल.

 मित्रांनो जर तुम्हीही सुशिक्षित बेरोजगार, किंवा सुशिक्षित असून मोलमजुरी करत असाल, किंवा तुम्हाला खुपच कमी मानधन मिळत असेल आणि त्यामुळे तुम्हाला काहीतरी स्वतःचा व्यवसाय किंवा काम सुरु करायचं असेल आणि गावात राहून काही वेगळे करू इच्छित असाल तर केंद्र सरकारची ही योजना तुम्हाला तुमची स्वप्ने पूर्ण करण्यात मदत करेल.  ही योजना म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर. ह्या योजनेला महाराष्ट्रात आपले सरकार सेवा केंद्र म्हणुन ओळखले जाते. तुम्ही तुमचे स्वतःचे कॉमन सर्व्हिस सेंटर (Common Service Center) म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र गावातच उघडून चांगली मोठी करू शकतात.

भारतातील मोदी सरकारने डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत निम्म्याहून अधिक जनसंख्या जी ग्रामीण भागात राहते त्या सुशिक्षित तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर योजना सुरू केली आहे. कॉमन सर्व्हिस सेंटरच्या मदतीने सरकार देशाच्या अशा दुर्गम भागात शासनाच्या सर्व योजना आणि ई-सेवा देत आहे जिथे लोकांकडे संगणक आणि इंटरनेट सुविधा नाही, इंटरनेटच्या अभावामुळे ग्रामीण भागातील लोकांचे अनेक सरकारी कामे पूर्ण होत नाहीत अडचणी येतात त्यासाठी देखील ही योजना अर्थात कॉमन सर्विस सेंटर फायद्याचे आहे.

 नेमक आपलं सरकार सेवा केंद्र म्हणजे काय?

कॉमन सर्व्हिस सेंटर अर्थातच आपलं सरकार सेवा केंद्र हे एक प्रकारचे छोटे सायबर कॅफे आहे. संगणक आणि इंटरनेटशी संबंधित अनेक सेवा म्हणजे ऑनलाईन कामे, वेगवेगळे फॉर्म भरणे, घराचा ऑनलाईन उतारा, शेतीचा ऑनलाईन सातबारा उतारा काढणे इत्यादी ह्या प्रकारची कामे इथे केले जातात. या सेवांमध्ये, ऑनलाईन कोर्सेस,

सीएससी मार्केट्स, कृषी सेवा, ई-कॉमर्स विक्री, आयआरसीटीसी म्हणजे रेल्वे बुकिंग, एअर आणि बस तिकीट बुकिंग, मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज इत्यादी कामे करता येतात. आपले सरकार सेवा केंद्र मध्ये पॅन कार्ड बनवणे, पासपोर्ट बनवणे, बँकिंग सेवा जसे की पैसे पाठवणे इत्यादी, जन्म / मृत्यू प्रमाणपत्र, एनआयओएस नोंदणी, आधार नोंदणी आणि छपाई, पेन्शन सेवा, विमा सेवा, टपाल सेवा संबंधित सर्व कामे करता येतात.

 कसं सुरु करणार आपले सरकार सेवा केंद्र

आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यासाठी शासनाने काही योग्यता व अटी घालून दिल्या आहेत. शासनाने घालून दिलेल्या अटींची पूर्तता करून कोणीही व्यक्ती आपले स्वतःचे आपले सरकार सेवा केंद्र सुरु करू शकतो.

आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यासाठी लागणाऱ्या पात्रता खालीलप्रमाणे :-

»ज्या व्यक्तीला आपले सरकार सेवा केंद्र सुरु करायचे आहे तो व्यक्ती किमान दहावी उत्तीर्ण असावा.

»आपले सरकार सेवा केंद्र महाराष्ट्रात सुरु करायचे असल्यास मराठी भाषा येणे अनिवार्य आहे, तसेच इंग्रजी भाषेचे देखील ज्ञान आवश्यक आहे.

»सर्व्यात महत्वाचे म्हणजे ज्या व्यक्तीला आपले सरकार केंद्र चालू करायचे आहे त्या व्यक्तीला संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.

»कॉमन सर्विस सेंटर सुरु करण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

»आपले सरकार सेवा केंद्र उघडण्यासाठी, आपल्याकडे 100-200 चौरस मीटरची जागा जागा असावी जागा ही केंद्र उभारण्यासाठी लागते.

»जागेबरोबरच तुमच्याकडे कमीत कमी 2 संगणक आणि पॉवर बॅकअप म्हणजेच विजेची व्यवस्था असावी.

»सेवा केंद्रात फॉर्मच्या प्रिंट काढण्यासाठी एक प्रिंटर आणि सर्व्यात महत्वाचे इंटरनेट कनेक्शन देखील आवश्यक आहे.

»सेवा केंद्र उघडण्यासाठी प्रथम दूरसंचार अभियांत्रिकी केंद्र (TEC) कडून आपले सरकार सेवा केंद्र टाकण्यासाठी लागणारं प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.

»हे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी शासनाला नाममात्र शुल्कही द्यावी लागेल.

»

याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर www.cscentrepreneur.in ह्या अधिकृत वेबसाईटवर मिळून जाईल.

»TEC कडून प्रमाणपत्र घेतल्यानंतर तुम्हाला कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू करण्यासाठी परवाना म्हणजेच लायसन्स घ्यावं लागेल.

»ह्यासाठी लागणारा परवाना काढण्यासाठी तुम्हाला register.csc.gov.in ह्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल.

»वेबसाईटवर जाताच एक पेज ओपन होईल, त्या पेजवर 'For CSC Registration' असे लिहिलेले दिसेल त्यावर क्लिक करा

»त्यांनतर खाली तुम्हाला आधार क्रमांक विचारला जाईल, आधार क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव टाकावे लागेल आणि नंतर कॅप्चा कोड भरावा लागेल.

»ह्या पद्धतीचे अनुसरण करून तुम्ही तुमचे कॉमन सर्व्हिस सेंटर अर्थात आपले सरकार सेवा केंद्र उघडू शकतात आणि चांगली कमाई देखील करू शकता.

 Source News18

English Summary: open aaple seva kendra in your village and earn more money Published on: 15 October 2021, 06:31 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters