'या' योजनेतून उघडा बँकेत खाते, मिळतोय १० लाख रुपयांचा वैयक्तिक विमा

22 January 2021 10:46 AM By: भरत भास्कर जाधव
जन धन  योजना

जन धन योजना

केंद्र सरकारने सुरू केलेल्या जनधन योजनेतून ग्राहक शून्य रुपये बॅलन्सवर बचत खाते उघडू शकतात. या योजनेंतर्गत आतापर्यंत ४१ कोटी लोकांनी खाती उघडली आहेत. या खात्यांमध्ये किमान बॅलेन्स शिल्लक ठेवण्याची गरज नसते. म्हणूनच या खात्याला ग्राहकांनी परवानगी दिली आहे. देशातील कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोदी सरकारने याची सुरूवात केली होती. या कार्ड्सद्वारे ग्राहकांना १० लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा संरक्षण दिले जाते.

रुपे सिलेक्ट क्रेडिट कार्ड (RuPay Select Credit Card) घेतल्यानंतर तुम्हाला १० लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा संरक्षण देण्यात येणार आहे. एसबीआय (SBI)आणि पीएनबीसह (PNB) सगळ्याच प्रमुख सरकारी बँका हे कार्ड जारी करत आहेत. एचडीएफसी (HDFC), आयसीआयसीआय बँक (ICICI), अ‍ॅक्सिस बँकेसह अनेक खाजगी बँकाही हे कार्ड देत आहेत.

 

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एखादा अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास खाते धारकाला किंवा त्याच्या कुटुंबाला विमा संरक्षण दिले जाते. रुपे कार्ड हे दोन प्रकारचे असतात. क्लासिक आणि प्रीमियम क्लासिक. या कार्डवर १ लाख रुपये आणि प्रीमियमवर १० लाखांपर्यंतचे कव्हर आहे.शुन्य बॅलेन्सवर हे खातं उघडलं जाऊ शकतं. यामध्ये अनेक खास सुविधा देण्यात आल्या आहेत. या खात्यासह रुपे एटीएम कार्ड, दोन लाख रुपयांचा अपघाती विमा संरक्षण, 30 हजार रुपयांचा लाइफ कव्हरही देण्यात आला आहे. इतकंच नाही तर खात्यात जमा झालेल्या रकमेवरही व्याज मिळेल.

या खात्यामध्ये १ हजारांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधासुद्धा देण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा फायदा आहे. अधिक माहितीनुसार, या खात्याच्या 6 महिन्यांपर्यंत समाधानकारक ऑपरेशननंतर ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. तर सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे पैसे थेट खात्यामध्ये पाठवण्यात येणार आहे. म्हणजेच या योजनेंतर्गत उघडलेल्या खात्यांमध्ये सरकार कोणत्याही योजनेचा डायरेक्ट बेनिफिट पाठवला जाईल.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल निवृत्तीवेतन योजना यासारख्या योजनांचा लाभ जनधन योजनेंतर्गत मिळू शकतो. 

personal insurance Scheme केंद्र सरकार पंतप्रधान जनधन योजना PM Jandhan Yojana वैयक्तिक अपघात विमा Personal accident insurance
English Summary: Open a bank account under this scheme, get personal insurance of Rs. 10 lakhs

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.