मोदी सरकारची नवी योजना : ग्रामीण भागासाठी १० हजार कोटींची आयुष्यमान सहकार योजना

20 October 2020 12:37 PM By: भरत भास्कर जाधव


आयुष्यमान भारत या योजनेनंतर मोदी सरकारने ग्रामीण भागासाठी एक नवी योजना आणली आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधार करण्यासाठी केंद्र सरकारने आयुष्यमान सहकार योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.या योजनेंतर्गत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (एनसीडीसी) ग्रामीण भारतातील आरोग्य सेवा पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सहकारी संस्थांना १० हजार कोटी रुपयांचे कर्ज देईल. सोमवारी सुरू करण्यात आलेल्या आयुष्यमान सहकार योजनेंतर्गत सहकारी संस्थांना ग्रामीण भागातील रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये उघडण्यासाठी  आणि इतर आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी कर्ज देण्यात येणार आहे.

केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी सोमवारी आयुष्यमान सहकार या नवीन योजनेची सुरुवात केली. या योजनेंतर्गत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या विकासासाठी सहकारी संस्थांना १० हजार कोटी रुपयांची कर्ज देईल.एनसीडीसीचे व्यवस्थापकीय संपादक संदीप नायक माध्यमांशी बोलताना म्हणाले कीदेशातील जवळपास ५२ रुग्णालये सहकारी संस्था चालवित आहेत. या रुग्णलयांमध्ये  बेडची संख्या ५ हजार आहे. आयुष्यमान सहकार योजना ग्रामीण भागातील रुग्णालयांची स्थापना,आधुनिकीकरण, विस्तार, दुरुस्ती, नुतनीकरण,आरोग्य सेवा आणि शैक्षणिक पायाभूत सुविधांचा समाविष्ट करेल, हे सहकारी रुग्णालयांना वैद्यकीय आणि आयुष शिक्षण सुरू  करण्यास मदत करेल. योजनेच्या आवश्यकतेनुसार कार्यशील भांडवल आणि मार्जिन मनी देखील प्रदान करेल.

ही योजना महिलांचा जास्त समावेश असणाऱ्या सहकारी  संस्थांना एक टक्का व्याज सूट उपलब्ध करुन देईल. तसेच एनसीडीसी  फंडाद्वारे सहकारी संस्थांच्या आरोग्य  सेवेच्या तरतूदीस प्रोत्साहित केले  जाईल. आरोग्य सेवेसाठी योग्य तरतूद असलेल्या सहकारी संस्थांना एनसीडीसीकडून कर्ज मिळू शकेल, असे सरकारने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दरम्यान सरकार शेतकऱ्यांसाठी पण ही योजना महत्त्वाची आहे. रुपाला म्हणाले की, ग्रामीण भागात सहकारी संस्थांची महत्त्वाची भूमिका आहे. सहकारी शेतकरी दुग्ध उत्पादनातून विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यापैकी काही सहकारी संस्था रुग्णालये देखील चालवतात.

modi government ayushyaman shakar yojana मोदी सरकार आयुष्यमान भारत आयुष्यमान सहकार योजना ग्रामीण भाग Rural areas राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ National Cooperative Development Corporation केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला Union Minister of State for Agriculture Purushottam Rupala
English Summary: Modi government's new scheme : 10 crore ayushyaman shakar yojana for rural

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.