1. इतर

नोव्हेंबरपर्यंत मोदी सरकार देत आहे मोफत रेशन; असे बनवा रेशन कार्ड


देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहेया विषाणूचे अधिक संसर्ग होऊ नये यासाठी सरकारने देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. परंतु स्थिती अजून बिकट होत असल्याने देशात परत ठिकठिकाणी लॉकडाऊन करण्यात येत आहे. लॉकडाऊन दरम्यान नागरिक उपासी राहू नये, यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरु केली. आता ही योजनेची मुदत वाढविण्यात आली असून नोव्हेंबरपर्यंत मोदी सरकार गरीबांना मोफत धान्य पुरवठा करणार आहे.  या योजनेतून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना (एनएफएसए) च्या ८० कोटी लाभार्थ्यांना  पुढील पाच महिन्यापर्यंत ५ किलो धान्य आणि १ किलो हरभरा दाळ मोफत मिळणार आहे.  या योजनेचा रेशन कार्डधारकांना थेट लाभ मिळणआर आहे.  जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ इच्छित आहात तर आपल्या कडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.  दरम्यान ज्या लोकांकडे रेशन कार्ड नाही त्यांनाही मोफत धान्य दिले जाणार आहे.

जर आपल्याला रेशन कार्ड बनवायचे असेल आपण  राज्य सरकराच्या पोर्टलवर जाऊन तेथे रेशन कार्डसाठी अर्ज करु शकता.  जर आपल्याला नवे रेशन कार्ड हवे असेल तर mahafood.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा.  या संकेतस्थळावरुन आपण आपली तक्रारही दाखल करु शकता.

आवश्यक कागदपत्रे

  • तलाठी रहिवासी दाखला व उत्पन्नाचा दाखला
  • लाइट बिल, घरफाळा पावती
  • घरमालकाचे संमतीपत्र
  • १० रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प
  • प्रतिज्ञापत्र (अॅफिडेव्हीट)
  • धान्य दुकानदाराचे पत्र
  • आधार कार्ड झेरॉक्स
  • बँक पासबुक झेरॉक्स व महिलेचे दोन फोटो

नवीन रेशनकार्ड कोणाला मिळते आणि कागदपत्रे -

जर आपल्याला ई- महासेवा केंद्रातूनही आपण रेशन कार्डसाठी अर्ज करु शकता. यासाठी आपण https://www.mahaonline.gov.in/   या संकेतस्थळावर जाऊन अर्ज डाऊनलोड करा. 

बाहेरगावाहून आलेले असल्यास : बाहेरगावाहून आलेले असल्यास त्याठिकाणच्या संबंक्षित सक्षम अधिकाऱ्याचा (तहसिलदार) स्थलांतराचा दाखला, रेशनकार्ड मूळप्रत.

ज्यांचे रेशनकार्ड कोठेच नाही : रेशनकार्डमध्ये कोठेच नाव नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र, तलाठ्याचा रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, लाइटबिल, भाडेकरू असल्यास घरमालकाचे संमतीपत्र, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक व ज्या महिलेच्या नावाने कार्ड काढावयाचे आहे त्यांचे दोन फोटो. विभक्त कुटुंब असेल तर : वरील कागदपत्रांशिवाय विभक्त राहत असल्याचा सरकारी पुरावा उदा. लाइटबिल, घरफळा पावती, ग्रामपंचायत असेसमेंट उतारा यापैकी एक पुरावा. विभक्त राहत असल्याचे प्रतिज्ञापत्र वडिलांनी किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तीने लिहून दिलेले असावे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters