1. इतर बातम्या

पोस्ट ऑफिसच्या योजनेत करा ५,००० रुपयांची छोटीशी गुंतवणूक, मिळवा ७.२५ लाख

पोस्ट ऑफिसच्या (Post Office) योजना सर्वसामान्य गुंतवणुकदारांमध्ये (common investors) लोकप्रिय असतात. कारण यामध्ये जोखीम (risk) अगदीच कमी असते आणि या योजनांमधून चांगला परतावादेखील (returns) मिळतो. पोस्ट ऑफिसची अशीच एक योजना आहे ज्यात तुम्ही फक्त ५,०४२ रुपयांचा प्रिमियम भरून ७.२५ लाख रुपये मिळवू शकता.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
ग्राम प्रिय स्कीम

ग्राम प्रिय स्कीम

पोस्ट ऑफिसच्या (Post Office) योजना सर्वसामान्य गुंतवणुकदारांमध्ये (common investors) लोकप्रिय असतात. कारण यामध्ये जोखीम (risk) अगदीच कमी असते आणि या योजनांमधून चांगला परतावादेखील (returns) मिळतो. पोस्ट ऑफिसची अशीच एक योजना आहे ज्यात तुम्ही फक्त ५,०४२ रुपयांचा प्रिमियम भरून ७.२५ लाख रुपये मिळवू शकता. ही योजना पोस्ट ऑफिसच्या सहा प्रमुख इन्श्युरन्स योजनांपैकी (insurance scheme) एक योजना आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव आहे ग्राम प्रिय (Post Office Gram Priya). ग्राम प्रिय योजनेचा कालावधी १० वर्षांचा आहे. ग्राम प्रिय योजना, पोस्ट ऑफिसच्या रुरल पोस्टल लाईफ इन्श्युरन्स स्कीमअंतर्गत (Rural postal life insurance scheme) येते.

काय आहे ग्राम प्रिय स्कीम (Post Office Gram Priya)

ग्राम प्रिय स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय किमान वय २० वर्षे आणि कमाल वय ४५ वर्षे इतके असले पाहिजे. ही स्कीम १० वर्षांच्या कालावधीसाठीची आहे. म्हणजेच मॅच्युरिटीसाठीचे किमान वय ३० वर्षे आणि कमाल वय ५५ वर्षे आहे. ग्राम प्रिय योजनेसाठी किमान सम अश्युअर्ड (sum assured) १०,००० रुपये इतके आहे. तर कमाल सम अश्युअर्ड १० लाख रुपये इतके आहे. या योजनेत विमाधारकाला १० वर्षांसाठी लाईफ इन्श्युरन्सचा (life insurance) लाभदेखील मिळतो.

पोस्टाची इव्हेस्टमेंट कम इन्श्युरन्स पॉलिसी (investment cum insurance policy)

पोस्ट ऑफिसची ग्राम प्रिय स्कीम ही एक इव्हेस्टमेंट कम इन्श्युरन्स पॉलिसी आहे. शिवाय ही एक मनी बॅक योजनादेखील आहे. म्हणजेच यात गुंतवणुकीबरोबरच विम्याचाही लाभ घेता येतो. या स्कीमअंतर्गत विमाधारक व्यक्तीला चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर २० टक्के, ७ वर्षे पूर्ण झाल्यानंतर २० टक्के आणि १० वर्षे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित ६० टक्के सम अश्युअर्ड मिळतील. याशिवाय ग्रामप्रिय स्कीमध्ये बोनसचीही रक्कमही मिळेल. एलआयसी दरवर्षी बोनसची घोषणा करत असते. प्रत्येक स्कीमसाठी बोनसची रक्कम वेगवेगळी असते. एलआयसीच्या माहितीनुसार सध्या ग्राम प्रिय स्कीमसाठी प्रति हजार सम अश्युअर्डसाठी ४५ रुपयांचा बोनस मिळतो आहे. पॉलिसी घेतल्यानंतर जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर नॉमिनीला सम अश्युअर्डची रक्कम आणि बोनसची रक्कम मिळते.

 

ग्राम प्रियचे लाभ आणि गणित (Benefits of Post Office Gram Priya)

या स्कीमचे प्रिमियम कॅल्क्युलेशन किंवा किती प्रिमियम भरावा लागणार हे पूर्णपणे तुमच्या वयावर अवलंबून आहे. जितके जास्त वय तितका जास्त प्रिमियम. जर २५ वर्षाच्या वयोगटात कोणी ही स्कीम घेतली आणि त्याचे सम अश्युअर्ड ५ लाख रुपये आहे तर त्या व्यक्तीचा दर महा प्रिमियम ५,०४२ रुपये असेल. या योजनेत १० वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याला सध्याच्या बोनसच्या दरानुसार २.२५ लाख रुपये मिळतील. जर त्या व्यक्तीने २०२१मध्ये या स्कीमची सुरूवात केली असेल तर नियमानुसार २०२५मध्ये सम अश्युअर्डच्या २० टक्के म्हणजेच १ लाख रुपये मिळतील. २०२८मध्ये १ लाख रुपये मनीबॅकच्या रुपात मिळतील. उर्वरित तीन लाख रुपयांचे सम अश्युअर्ड २०३१मध्ये मिळतील आणि शिवाय २.२५ लाख रुपयांचा बोनसदेखील मिळेल. याप्रकारे मनी बॅकशिवाय २०३१मध्ये एकरकमी ५.२५ लाख रुपये मिळतील . (सम अश्युअर्डचे उर्वरित ३ लाख रुपये आणि २.२५ लाख रुपयांचा बोनस)

सध्याच्या काळातील विम्याचे महत्त्व (Importance of insurance)

आर्थिक नियोजनात आयुर्विम्याचे महत्त्व फार मोठे आहे. कोरोनाच्या संकटकाळात तर आयुर्विम्याचे महत्त्व फारच वाढले आहे. त्यामुळे लवकरात लवकर आयुर्विमा घ्या. तुमच्या पश्चात कुटुंबाच्या आर्थिक गरजांसाठी विमा असणे महत्त्वाचे ठरते. विम्याच्या रकमेतून तुमच्या पश्चात कुटुंबाच्या आर्थिक गरजांची काळजी घेतली जाऊ शकते. शिवाय ऐनवेळाला उद्भवणाऱ्या वैद्यकीय खर्चासाठी तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा आरोग्य विमा असणे फार महत्त्वाचे ठरते. यामुळे तुमची अनेक वर्षांची बचत वैद्यकीय खर्चात विनाकारण खर्ची पडणार नाही.

English Summary: Make a small investment of Rs 5,000 in a post office scheme, get Rs 7.25 lakh Published on: 22 May 2021, 10:49 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters