1. इतर

कमी गुंतवणुकीत सुरू करा टिश्यू पेपरचा व्यवसाय; कमवा लाखो रुपये

फोटो - इंडिया मार्ट

फोटो - इंडिया मार्ट


आपण सध्या अशा युगात जगत आहोत, जेथे प्रत्येकांची जीवनशैली बदललेली आहे. आपल्या राहणीमानापासून ते आपल्या खाण्यांच्या सवयीमध्ये बदल झाला आहे. आधी आपण बसून जेवण करत होतो आता उभ्याने जेवण करतो. जेवणातांना आपण पाच बोटांचा वापर करत होतो पण आता त्याऐवजी चमचे आले आहेत. आपल्या जेवणात आणि साफ- सफाईमध्येही  एक बदल झाला आहे. तो म्हणजे जेवणानंतर आपण आता हात टेश्यू पेपरने पुसतो. तर चेहरा धुतल्यानंतर आपण टेश्यूचा वापर करत असतो. सध्याच्या काळात टेश्यू पेपरचा मोठा वापर वाढला आहे. याची मागणी वाढल्याने याचा पुरवठा आवश्यक झाला आहे, परिणामी टेश्यू बनवणाऱ्यांच्या हाताला काम मिळत त्यांच्या खिशात आमदनी वाढली आहे. आज आपण याच व्यवसायासविषयी जाणून घेणार आहोत.....

हॉटेलपासून ते कार्यालयापर्यंत सर्व ठिकाणी टेश्यू पेपरची मागणी आहे. यामुळे या व्यवसायात नफा मोठा दिसतो. पण याचे मार्केट शोधणे आवश्यक असते. दरम्यान हा व्यवसाय सुरू करण्यास सरकारही मदत करते. या व्यवसायाचा खर्च - बाजारात टेश्यू पेपरची वाढती मागणी आहे. यामुळे हा व्यवसाय करणे फायदेकारक आहे. जर आपल्याला नवीन काहीतरी करायचे असेल किंवा व्यवसाय टाकायचा असेल तर अशा उद्योजकांसाठी किंवा स्वताच्या व्यवसाय करू इच्छुणांऱ्यासाठी टेश्यू पेपरचा व्यवसाय उत्तम पर्याय आहे. या व्यवसायासाठी साडे तीन लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जर आपल्याकडे इतकी रक्क्म नसेल  तर यात सरकार मु्द्रा योजनेच्या माध्यमातून सरकार आपली मदत करेल. आपल्या कोणत्याही बँकेत मुद्रा लोन भेटू शकते. टर्म लोनच्या माध्यमातून आपण ३ लाख १० रुपये आणि वर्किंग कॅपिटल कर्जातून  ५ लाख ३० हजार रुपयांची कर्ज मिळू शकते. पण एक गोष्ट लक्षात असू द्या जर बँकेच्या अटी व शर्तीमध्ये आपण बसलो नाहीतर बँक आपल्याला कर्ज देत नाही.

होणार कोट्यवधीची कमाई 

या व्यवसायातून आपण वर्षाला दीड लाख किलोग्रॅम पेपर नॅपकिनचे उत्पादन मिळू शकता. जर आपल्या अधिक प्रमाणात उत्पादन घ्यायचे असेल तर आपल्याला परवानगी घ्यावी लागेल. आपण नॅपकिनचे उत्पादन बाजारात ६५ रुपये प्रति किलोग्रॅमच्या दरात विकू शकता. जर वर्षाला आपण दीड लाख उत्पादन करू शकाल तर ६५ रुपये किलो प्रमाणे आपला टर्नओवर साधारण ९७.५० लाख रुपये होईल. यातून आपण खर्च काढला तर वर्षाला निव्वळ नफा १० ते १२ लाख रुपये राहिल.

व्यवसाय सुरू करण्यास लागणारा खर्च  - यासाठी आपल्याला मशीन घ्याव्या लागतील. या मशीन घेण्यासाठी साधरण ४ .४० लाख रुपये लागतील. एकदाच आपल्याला हा खर्च करावा लागेल.  कच्चा मालासाठी यावर साधरण ७.१३ लाख रुपयांच्या खर्च येईल. जर आपण इतर खर्चाबद्दल चर्चा केली तर पहिल्यांदा तुम्हाला ११ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागेल, त्यामध्ये वाहतुकीचा आणि उपभोग्य वस्तूंचा खर्च, टेलिफोन, स्टेशनरी, देखभाल आणि वीज बिलांचा समावेश आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters