पोस्ट खात्याशी जोडा आधार अन् घ्या सरकारी योजनांचा लाभ; जाणून घ्या पद्धत

18 September 2020 06:54 PM By: भरत भास्कर जाधव


कोणत्या पोस्ट कार्यालयात खाते आहे का , काय आपले बचत खाते आधारशी लिंक केले आहे का  काय आपल्याला सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा आहे कातर आपल्याला आपले बचत खात्याला आधार कार्डाशी लिंक करावे लागेल.  बचत खात्याला लिंक केल्यानंतर तुम्ही सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घेऊ शकतात. इतकेच नाही तर सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्व सब्सिडी थेट आपल्या खात्यात येत असते.

सरकारी सब्सिडी मिळविण्यासाठी आधार लिंक करणे आवश्यक

दरम्यान पोस्ट विभागाकडून  नुकतेच एक सर्कुलर काढणयात आले आहे. यात असे म्हटले आहे की, सरकारी सब्सिडी थेट आपल्या खात्या हवी असल्यास आपल्याला आधार लिंक करावे लागेल.  दरम्यान ग्राहकांच्या सुविधेसाठी  टपाल विभागाकडून  एप्लीकेशन ऑफ सर्टिफिकेट फॉर्म मध्ये एक कॉलमचा समावेश करण्यात आल आहे. यात खातेधारक आधारचा पर्याय निवडू शकतात.

नवीन - जुन्या ग्राहकांना करावे लागेल हे काम

टपाल विभागाने नव्या ग्राहकांसाठी  अर्जातच आधार निवडण्याचा एक पर्याय दिला आहे. तर जुने ग्राहक आपल्या जवळील टपाल कर्यालयात जाऊन अपडेट करू शकतील. यासाठी त्यांना एप्लीकेशन फॉर लिंकिग किंवा आणि रिसिविंग डीबिटी  बेनिफिट्स इनटू पीओएसबी अकाउंट च्या नावाने  जारी करण्यात आलेले अर्ज भरावे लागेल.  याच्या मार्फत खातेधारक आपले आधार कार्ड बचत खात्याशी जोडू शकतो.  दरम्यान   आधार लिंक करण्याचे काम आपण ऑनलाईनही करू शकतो. यासाठी  आपल्याला टपाल विभागाच्या  अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लिंक करु शकतो.

 इनरॉलमेंट नंबरने ही लिंक करु शकतो आधार

जर आपले आधार कार्ड बनलेले नसेल. पण आपण अर्ज केला असेल  तर आधारच्या इनरॉलमेंट नंबर ही पण सबमिट करु शकतात. दरम्यान  ३१ डिसेंबर पर्यंत आपण आधार नंबर जोडू शकतो. यातून आपण पीपीएफ, राष्ट्रीय बचत पत्र, एनएससी, किसान विकास पत्र आदीचा फायदा आपण घेऊ शकतो. यासह आपण डीबिट सुविधेतून पेंशन  किंवा एलपीजी वर मिळणारी सब्सिडी चा देखील लाभ आपण घेऊ शकतो.

Aadhaar card government schemes Post Account postal department पोस्ट खाते सरकारी योजना आधार कार्ड टपाल विभाग
English Summary: Link to Post Account Get Aadhaar and Benefits of Government Schemes, Learn Method

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.