1. इतर

एल आय सी चा न्यू चिल्ड्रन्स मनी बँक प्लॅन, तुमच्या मुलांचे भविष्य होईल सुरक्षित

KJ Maharashtra
KJ Maharashtra
LIC

LIC

  एलआयसी ही विमा क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी एलआयसीने नवनवीन  आणि उत्तम परतावा मिळतील अशी प्लान आणलेले आहेत. असाच एक प्लॅन मुलांसाठी एलआयसी मी आणला आहे जो की  मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांना चांगली नोकरी मिळावी किंवा त्यांचे करिअर उत्तम असावे, त्यांचे लग्न चांगल्या पद्धतीने पार पडावे अशा प्रकारच्या इच्छा प्रत्येक पालकांच्या मनात असतात. या सगळ्या पालकांच्या इच्छा-आकांक्षा लक्षात घेऊन एलआयसी ने एक प्लान बनवला आहे त्याचे नाव आहे न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन हा होय. त्याबद्दल या लेखात माहिती घेऊ.

   काय आहे आपला प्लॅन?

 या योजनेची महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या फक्त दहा हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येते. जेव्हा मूल अठरा वर्षाचे होते तोपर्यंत लाखो रुपयांचा परतावा या योजनेच्या माध्यमातून मिळतो. त्यामुळे मुले अठरा वर्षाच्या पुढे गेल्यानंतर त्यांना लागणारा शिक्षणासाठी व इतर गरजांसाठी पैशाची कमतरता भासत नाही. या प्लॅनचा कालावधी हा पंचवीस वर्षाचा असून  मॅच्युरिटी ची रक्कम टप्प्याटप्प्याने विभागून मिळते. मुलांचे वय 18 वर्षे, वीस वर्ष आणि बावीस वर्षांची झाल्यावर बेसिक सम अशुर्ड च्या 20 -20  टक्के रक्कम पॉलिसीधारकाला मिळते. उर्वरित 40 टक्के रक्कम ही मुलांचे वय 25 वर्षे पूर्ण झाल्यावर मिळते. सोबत बोनसची रक्कम देखील दिली जाते.

या प्लॅनची वैशिष्ट्ये

  • एल आय सी चा न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन घेण्यासाठी किमान वय 20 वर्ष आणि कमाल वय 12 वर्षे असले पाहिजे.
  • या पॉलिसी मधील किमान गुंतवणुकी दहा हजार रुपये आहे.
  • यामध्ये प्रीमियम व्यवहर बेनिफिट रायडर ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे.
  • पॉलिसीचा कालावधी दरम्यान जर  पॉलिसी धारकांचा मृत्यू झाला तर विमा रक्कम या व्यतिरिक्त बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस रक्कम नॉमिनी ला मिळते. डेट बेनिफिट हे एकूण प्रीमियम पेमेंट 4 च्या एकशे पाच टक्‍क्‍यांपर्यंत असते.

 

 

आवश्यक कागदपत्रे

1-ही पॉलिसी घेण्यासाठी आई-वडिलांकडे त्यांचे मुलाचे किंवा मुलीचे आधार कार्ड असले पाहिजे.

2- पॅन कार्ड आणि एड्रेसप्रूफ ची फोटो कॉपी असली पाहिजे.

3-विमाधारकाच्या मेडिकल कागदपत्रे आवश्यक असतात.

4- अर्जासाठी एलआयसीच्या शाखेतून योजनेशी संबंधित फॉर्म घ्यावा आणि कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून हा फॉर्म जमा करावा.

 

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters