Kisan Vikas Patra: दुप्पट करा आपला पैसा ; जाणून घ्या योजनेची माहिती

05 May 2020 01:05 PM


जर तुम्हाला आपली रक्कम दुप्पट करायची असेल तर पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना (Kisan Vikas Patra scheme) ही सर्वोत्तम योजना आहे. सध्या दिवसेंदिवस वाढणारा खर्च आणि मर्यादित असलेली आपली आमदनी यामुळे महिन्याचे आपले बजेट नेहमी कोलमडत असते. ही परिस्थीती बदलण्यासाठी पोस्ट ऑफिसची ही योजना फार फायदेशीर असून ही अल्प बचतीवर आधारलेली योजना आहे. केंद्र सरकारकडून ही योजना राबवली जाते. यामुळे या योजनेत गुंतवणूक केल्यास आपल्याला निश्चितच चांगली रक्कम मिळते. या योजनेसाठी केंद्र सरकारनेच व्याजदर निश्चित केले आहे. इंडिया पोस्टच्या वेबसाईटनुसार या  किसान विकास पत्र योजनेचा कालवधी आता १२४ महिन्यांचा करण्यात आला आहे. याचाच अर्थ १२४ महिन्यात तुमचे पैसे दुप्पट होतील. या बदला आणखी एक बदल करण्यात आला असून हा या योजनेचे व्याजदर हे एक टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे.

किसान विकास पात्र पात्रता Kisan Vikas Patra Eligibility

अर्जदार एक प्रौढ असावा आणि तो भारतीय रहिवाशी असावा.

तो किसान विकास पत्र स्वत: च्या नावे किंवा अल्पवयीन वतीने अर्ज करू शकतो.

ट्रस्ट देखील या योजनेत गुंतवणूक करण्यास पात्र आहेत. एचयूएफ (हिंदू अविभाजित कुटुंब) आणि अनिवासी भारतीय केव्हीपीमध्ये गुंतवणूक करण्यास पात्र नाहीत.

(Benefits of Kisan Vikas Patra) किसान विकास पत्राचे फायदे

गुंतवणुकीची लवचिकता - केव्हीपी मध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त रक्कमही ठेवू शकता. कमीत कमी १०० रुपयांपासून गुंतवणूक करु शकता. जास्तीत जास्त आपण ५० हजार रुपयांची गुंतवणूक करु शकता.

परताव्याची हमी  - ही योजना केंद्र सरकारच्या मार्फत राबवली जाते. यामुळे परताव्याची हमी आपल्याला मिळत असते.  या योजनेत गुंतवणूक करण्यात कोणत्याच प्रकारचा धोका नाही.

(Kisan Vikas Patra: How to Apply) कसा अर्ज कराल

अर्ज करण्यासाठी दोन प्रकारच्या पद्धती आहेत, तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईनही करु शकतात.

यासाठी आपल्या पोस्ट ऑफिसमधून केव्हीपी अर्ज फॉर्म किंवा फॉर्म-ए घ्यावा लागेल.

सर्व संबंधित तपशील भरा आणि पोस्ट ऑफिसमध्ये सबमिट करा.

जर एजंटमार्फत गुंतवणूक केली गेली असेल तर दुसरा फॉर्म भरावा आणि सबमिट करावा लागेल.

दोन्ही प्रकारचे अर्ज फार्म हे https://www.indiapost.gov.in/. या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

केवायसी प्रक्रियेसाठी आपल्याला आपल्या ओळखीच्या पुराव्यांची एक प्रत द्यावी लागेल. आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स / पासपोर्ट / मतदार ओळखपत्र / पॅन कार्ड.

Post Office Kisan Vikas Patra Scheme Kisan Vikas Patra scheme Post Office Scheme Post Office Scheme Guarantees to Double Your Investment पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना किसान विकास पत्र योजना किसान विकास पत्र योजनेतून दुप्पट करा आपला पैसा
English Summary: Kisan Vikas Patra: This Post Office Scheme Guarantees to Double Your Investment, Know the Details

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.