ऐकलं का ! किसान क्रेडिट कार्डची १० टक्के रक्कम वापरता येणार घरगुती खर्चासाठी

06 May 2020 12:51 PM


कोरोनामुळे देशात गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन चालू आहे. यामुळे उद्योगधंदे, शेतीची कामे बंद आहेत. हातात रोख पैसा नाही, मात्र घरगुती खर्चासाठी पैसा लागणार आहे. पण पैसा नसल्याने खर्च कसा भागणार अशी चिंता आता सगळ्यांना पडली असेल. परंतु ज्यांच्याकडे किसान क्रेडिट कार्ड आहे,  त्यांची मात्र या  चिंतेतून सुटका झाली आहे. हो शेतीच्या कामासाठी उपयोगात येणारे किसान क्रेडिट कार्ड आता तुमच्या घरातील वस्तू आणि किराणा भरण्यासाठी उपयोगात येणार आहे.

किसान क्रेडिट कार्ड शेतीच्या कामासाठी उपयोगात येत होते. खते, बियाणे, अवजारे, आदीच्या कामासाठी या कार्डचा उपयोग होत होता. परंतु आता या कार्डच्या साहाय्याने तुम्ही आता किराणा भरु शकता. कोरोनामुळे लॉकडाऊन चालू आहे. या दरम्यान अनेक शेतकऱ्यांना रोकडची चणचण भासत आहे. यावर केसीसीने ही सुविधा दिली आहे.

घरगुती गरजांमध्ये केसीसी शेतकर्‍यांना कशी मदत करू शकेल? (How KCC can help Farmers in domestic needs?)

केसीसी योजनेअंतर्गत अल्प मुदतीच्या मर्यादेच्या १० टक्के घरगुती वापरासाठी वापरता येऊ शकतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India ) किंवा आरबीआयने आपल्या आर्थिक शिक्षण (शेतकर्‍यांसाठी) कलमांतर्गत या संदर्भात आपल्या वेबसाइटवर माहिती दिली आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजनेचा हेतू म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या पीक कर्जाची आवश्यकता पूर्ण करता यावी. यामुळे रिझर्व्ह बॅंकेने आपल्या घरगुती खर्चाची पूर्तता करण्यासाठी मोठ्या प्रमाणात न वापरण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.  केसीसी कर्जाची वेळेवर भरणा केल्यास शेतकऱ्यांना भविष्यातील कर्जावर अधिक लाभ मिळू शकेल.  रिझर्व्ह बँकेने बँकांना एक मार्गदर्शिका जारी केली आहे. त्याअंतर्गत, १ मार्च २०२० ते ३१ मे २०२० दरम्यान ज्यांची खाती बाकी आहेत किंवा होतील. अशा शेतकर्‍यांना अल्प मुदतीच्या पीक कर्जासाठी २% व्याज सबवेशन (आयएस) आणि ३% च्या प्रॉम्प्ट रीपेमेंट इन्सेन्टिव्ह (पीआरआय) चा लाभ देण्यास सांगितले आहे.

KCC scheme for household consumption KCC scheme Reserve Bank of India kisan credit card रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किसान क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्डची १० टक्के रक्कम वापरता येणार घरगुती खर्चासाठी KCC Holders can spent 10% of Money for Household
English Summary: KCC Holders can spent 10% of Money for Household Needs

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.