1. इतर बातम्या

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजना ; करा गुंतवणूक अन् मिळवा दुप्पट रक्कम

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने छोटी बचत योजना आणली आहे. पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना असून यात शेतकरी छोट-छोटी बचत करु शकतील. आता छोट्या बचत योजनांच्या व्याज दरामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. नवीन किसान विकास पत्र खात्याचा मॅच्युरिटी कालावधी ११३ महिन्यांऐवजी १२४ महिन्यांचा असेल.

KJ Staff
KJ Staff


शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने छोटी बचत योजना आणली आहे. पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना असून यात शेतकरी छोट-छोटी बचत करु शकतील. आता छोट्या बचत योजनांच्या व्याज दरामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. नवीन किसान विकास पत्र खात्याचा मॅच्युरिटी कालावधी ११३ महिन्यांऐवजी १२४ महिन्यांचा असेल.

काय आहे पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजना (Post Office Kisan Vikas Patra Scheme)
पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र खात्यावर वार्षिक व्याज दर 6.9% आहे, जो आधी 7.6% होता. एकदा पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक केली की गुंतवणूकदारास त्या पैशाच्या परताव्यासह सुरक्षिततेची हमी सरकार घेत असते. पोस्ट ऑफिस किसान विकास पत्राचा वार्षिक व्याजदर हा खाते उघडताना केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीवरुन ठरवला जात असल्याचे जित्युंद्र सोलंकी यांनी सांगितले. जर समजा एखाद्याने या वर्षाच्या आर्थिक वर्षात खाते उघडले तर ती व्यक्ती ७.६ टक्के वार्षिक व्याजदराचा लाभ घेऊ शकतो. जे एप्रिल- जून २०२० मध्ये खाते उघडतील अशा नवीन खातेधारकांना नवीन दर लागू होतील.  पोस्ट ऑफिस किसान विकास पत्रामध्ये पैशांची आणि परताव्याची हमी आहे. दरम्यान या योजनेच्या व्याजदरात घसरण झाली आहे. पण नवीन खातेधारक नक्कीच दुप्पट रक्कम मिळवतील.

पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र (KVP)  योजनेमध्ये कसे होतील पैसे दुप्पट
सोलंकी यांच्या मते, केव्हीपी (KVP) खात्याचा कालावधी १० वर्ष  आणि ४ महिने आहे. जर एखादी व्यक्ती १ हजार रुपये  आता या खात्यात टाकते. तर मॅच्युरिटीच्या काळापर्यंत हे पैसे दुप्पट म्हणजे २००० होतील.  इंडिया पोस्ट ऑफिसचे संकेतस्थळ ( indiapost.gov.in) रक्कम दुप्पट होण्याचा दावा करते. गुंतवणूक करताना किमान १ हजार रुपये यात टाकावे लागतील. या योजनेत पैसे गुंतवणुकीसाठी कोणतीच मर्यादा नाही. केव्हीपी(KVP) योजनेचा लाभ आपण पोस्ट कार्यालयाच्या कोणत्याही विभागिय कार्यालयातून घेऊ शकतात. केव्हीपी यासह आणखी एक सुविधा आहे, गुंतवणूकदार आपले पैसे दुसऱ्याला पाठवू शकतो. एका पोस्टातून दुसऱ्या पोस्टातही पाठवू शकतो.

English Summary: Invest in Post Office Kisan Vikas Patra Scheme & Get Your Money Doubled Published on: 07 April 2020, 05:43 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters