आनंदाची बातमी ; आंबा प्रक्रिया उद्योजकाला मिळतील ४० हजार रुपये

26 February 2021 06:58 PM By: भरत भास्कर जाधव
आंबा प्रक्रिया उद्योजकाला मिळतील ४० हजार रुपये

आंबा प्रक्रिया उद्योजकाला मिळतील ४० हजार रुपये

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग उन्नयन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ इच्छिणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादकाला प्रक्रिया उद्योगासाठी किमान ४० हजार रुपये मिळू शकतील.

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उन्नयन योजनेत केंद्राचा वाटा ६० टक्के असेल. या योजनेसाठी देशभरात १० हजार कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.या योजनेमध्ये एक जिल्हा एक उत्पादन हे धोरण स्वीकारण्यात आले असून सिंधुदुर्ग  जिल्ह्यामधून आंबा पिकाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आंबा उत्पादकांचा मूल्यसाखळी विकास आणि पायाभूत सुविधांचा उभारणीसाठी मदत होणार आहे.

 हेही वाचा : आपल्या आंबा बागेत फळगळ होतेय का? काय आहेत यामागील कारणे ; वाचा सविस्तर

योजने अंतर्गत अस्तित्वात असलेल्या सूक्ष्म उद्योगांचे आधुनिकरण करुन त्यांना संघटित क्षेत्रामध्ये रुपांतरित करणे शेतकरी उत्पादक संस्था, बचत गट, सहकारी संस्थांना सार्वजनिक पायाभूत सुविधा , मूल्यवर्धन , फॉर्वर्ड बॅकवर्ड लिंकेज, ब्रँडिग, आणि बाजारपेठ सुविधा याकरिता योजनेअंतर्गत पॅकेज उपलब्ध करुन देणे हे उद्देश आहेत. जिल्ह्यातील कृषी अन्न प्रक्रियेशी संबंधित असलेल्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना सामायिक पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी क्रेडिट लिंकद्वारे बँक कर्जाशी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.

 

 

कसा असेल निधी

 

पायाभूत सुविधा, मूल्यवर्धन, फॉर्वर्ड बॅकवर्ड लिंकेज, भाग भांडवल गुंतवणूक याकरिता प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के निधी , कमाल अनुदान १० लाख रुपयांच्या मर्यादेत आणि ब्रॅडिग आणि बाजारपेठ सुविधेसाठी प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के अनुदान निधी क्रेडिट लिंक्ड कॅपिटल सब्सिडी या आधारावर दिले जाणार आहे. लाभार्थी हिस्सा म्हणून प्रकल्प किमतीच्या १० टक्के रक्कम देणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, जमाती व महिला लाभार्थ्यांना योजनेचा लाभ  प्राधान्यने देण्यात येणार आहे. प्रशिक्षण आणि क्षमताबांधणीसाठी विहित मापदंडानुसार होणार संपूर्ण खर्च १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. स्वयंसहाय्यता बचत गटांना खेळते भांडवल आणि छोटी अवजारे खरेदीसाठी अन्नप्रक्रिया उद्योगाशी संबंधित कमाल १० सदस्यांना कर्ज किंवा गुंतवणूक, भांडवल म्हणून फेडरेशनमार्फत प्रति सदस्य कमाल ४०हजार रुपये दिले जातील.

कुठे कराल संपर्क

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आंबा उत्पादक आणि प्रक्रिया उद्योग करणाऱ्या  वैयक्तिक लाभार्थ्यांनी

https://mofpi.nic.in/pmfme  आणि http://pmfme.mofpi.gov.in/pmfme/#/

 

या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्ज करावा

शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहायता गट, सहकारी गट, सहकारी संस्थांनी ऑफलाइन पद्धतीने  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी , कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, आत्मा कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Mango processing entrepreneur Mango processing Sindhudurg district प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग उन्नयन योजना Pradhan Mantri Micro Food Processing Industry Upgradation Scheme आंबा प्रक्रिया उद्योजक आंबा प्रक्रिया
English Summary: Good news for farmers in Sindhudurg; Mango processing entrepreneur will get Rs 40,000

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.