केंद्राच्या 'या' योजनेतून घ्या शेतीची अवजारे; वाढवा आपल्या शेतीचे उत्पन्न

08 April 2020 01:46 PM


शेतकरी शेतीची कामे आधुनिक यंत्राच्या साहाय्याने केली जातात. यामुळे कामे लवकर होऊन उत्पन्न वाढीसाठी यांत्रिक शेती फार फायदेशीर असते. परंतु शेतीच्या अवजारांची किंमत अधिक असल्याने बऱ्याच वेळा शेतकरी ही अवजारे घेत नसतात. गोष्टीची दक्षता घेत केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी देशात ४२ हजार कस्टम हायरिंग केंद्र बनविले आहेत.  शेतकऱ्यांच्या समस्या कमी व्हाव्यात यासाठी मोदी सरकारने अनेक अनेक निर्णय घेतले आहेत. काही राज्य सरकारांनी शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारी अवजारे खरेदी करण्यासाठी १०० टक्क्यांची सब्सिडी/ अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना कस्टम हायरिंग केंद्र सुरु करण्यासाठी पैसे लागणार नाहीत.

यांत्रिकरणाला प्रोत्साहन - (Mechanization encouraged in farming)
शेतीत यांत्रिकीकरण वाढावे यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने कृषी यांत्रिकीकरण उपमिशन नावाची योजनेची सुरुवात केली आहे. याच्या आधारे लागवड, पेरणी, कापणी, मशागत, अशा कामांसाठी लागणाऱी अवजारे शेतकऱ्यांना दिली जाणार आहेत. या अवजारांची किंमत अधिक असते, यामुळे शेतकरी ही अवजारे पैशाअभावी घेत नसतात. परंतु या योजनेच्या मदती शेतकरी ही अवजारे घेऊ शकणार आहेत. कृषी यांत्रिकीकरण उपमिशनच्या माध्यमातून लॅण्ड लेव्हलर, झिरो टिल सीड ड्रील, हॅप्पी सीडर, मल्चर आदी सारखे उपकरणे मिळतील. यातून शेतकरी आपले उत्पन्न वाढू शकतील.
दरम्यान पुर्वेकडील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने अधिक फायदा देत आहे. त्यांच्यासाठी कस्टम हायरिंग केंद्रासाठी १०० टक्के आर्थिक सरकारकडून दिले जाते. जर कोणी या कृषी उपकरणांसाठी अर्ज करु इच्छितात. ते सीएससी कॉमन सर्विस सेंटर) वर जाऊन https://register.csc.gov.in/ अर्ज करु शकतात. यासह शेतकरी इंटरनेटवरुनही आपला अर्ज करु शकतात. यासाठी https://agrimachinery.nic.in/ या पोर्टलवर जाऊन अर्ज करु शकतात.

agriculture equipment government scheme agriculture producation Agriculture Machinery Custom Hiring Center central government शेती अवजारे शासकीय योजना शेतीचे उत्पन्न केंद्र सरकार भाडेतत्वावर अवजारे सेवा केंद्र tillage seed drill happy seeders हॅप्पी सीड्रर्स ट्रिलज सीड ड्रिल
English Summary: get agriculture equipment's through this government's scheme, increased your production

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.