1. इतर

वनशेती

KJ Staff
KJ Staff


श्री समर्थ लक्ष्मी अ‍ॅग्रो सर्व्हिसेस, एलएलपी ही महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील कंपनी आहे. कंपनीमध्ये तीन संचालक आहेत. त्यातील श्री. कुंदन पाटील हे महाराष्ट्र राज्यात कंपनीचे प्रमुख आहेत. कंपनीने शेतकर्‍यांसाठी योजना तयार केल्या आहेत. वनशेतीला प्राधान्य ही यापैकीच एक योजना आहे. कंपनी आफ्रिकन जातीच्या मोहगनी (Swietenia macrophylla) रोपांची लागवड करण्यात प्रवृत्त करते आहे.

हा वृक्ष अतिशय मजबूत असतो आणि आफ्रिकेमध्ये तो 140 ते 150 फुटांपर्यंत वाढतो. 10 ते 12 वर्षाच्या काळात भारतात हा वृक्ष 35 ते 40 फुटांपर्यंत वाढतो. उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये देखील याची लागवड केली जाऊ शकते. महाराष्ट्र राज्यातील शेतकर्‍यांनी याची लागवड आधीच सुरू केली आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि नुकतेच आंध्रप्रदेश येथे 40 हजार एकर जमिनीवर महोगनीची लागवड करण्याचे नियोजन कंपनीने केले आहे.

याचे लाकूड अतिशय मजबूत असल्याने होड्या, घरगुती वापराच्या वस्तू, वाद्ये आणि अनेक प्रकारच्या टिकाऊ वस्तू निर्मितीसाठी हे उपयुक्त आहे. बाजारात या लाकडाला प्रचंड मागणी आहे. भारतात एकूण लाकडाचा बाजार तेजीत असून तो दरवर्षी 2 लाख कोटी रू. इतका आहे.

कंपनीतर्फे देण्यात येणारे लाभ आणि फायदे:

  • श्री समर्थ लक्ष्मी अ‍ॅग्रो सर्व्हिसेस, एलएलपी ही कंपनी रोप लागवडीसाठी तुमच्याशी करार करते जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी यांचेकडे या कराराची नोंदणी केली जाते.
  • शेतकरी 500 रोपे/एकर या प्रमाणात कितीही एकरासाठी लागवड करून शकतात. दर 3 महिन्यांनी कंपनीचा अधिकारी त्या जागेला भेट देऊन रोपांचे परिक्षण करतो आणि रोपांची देखभाल, खते, किटकनाशकांंचा वापर यासंबंधी माहिती देतो.
  • चौथ्या वर्षानंतर प्रती एकरासाठी 50 हजार रूपयांचे अ‍ॅडव्हान्स देते. सातव्या वर्षानंतर त्यावेळच्या बाजारभावानुसार ही झाडे विकण्याची परवानगी शेतकर्‍यांनी दिल्यानंतर विक्री केली जाते. जर बाजार भाव कमी असेल तर कंपनीशी झालेल्या करारानुसार, कंपनी हे लाकूड किमान भावात खरेदी करते.
  • लागवडीनंतर 5 ते 12 वर्षे या काळात ‘कार्बन क्रेडीट’ निधीचा लाभ घेता येतो. (ही अनामत रक्कम नसून ती अतिरीक्त रक्कम असते)

संपर्क: 
एस एस एल अॅग्रो (02328-243599, 9021414271)
वेबसाईट: www.sslagro.com 
ईमेल: kundan@sslagro.com
युट्यूब व्हिडीओ: sslagro mahogani
टिप: महाराष्ट्र राज्यासाठी चॅनेल पार्टनर हवे आहेत.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters