1. इतर बातम्या

भविष्यात येणारे पैशांचे संकट टाळण्यासाठी वापरा या टिप्स

भविष्यासाठी योग्य पैशांचे नियोजन करणे फार उपयुक्त असते.वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्याला येणाऱ्या उत्पन्नातून शक्य तेवढी बचत करणे हे भविष्य सुरक्षित करणे बाबतीत महत्त्वाचे ठरते. बऱ्याचदा होते असे की, अचानक काही तरी संकट बघते जसे काही हॉस्पिटल चा खर्च, कधीकधी बऱ्याच व्यक्तींचे पर्सनल लोन,कार लोन, होम लोन इत्यादींचे ईएमआय चालू असतात व अचानक काही कारणास्तव येणारे उत्पन्न थांबते. मोठे आर्थिक संकट उभे राहते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
financial tips

financial tips

 भविष्यासाठी योग्य पैशांचे नियोजन करणे फार उपयुक्त असते.वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्याला येणाऱ्या उत्पन्नातून शक्य तेवढी बचत करणे हे भविष्य सुरक्षित करणे बाबतीत महत्त्वाचे ठरते. बऱ्याचदा होते असे की, अचानक काही तरी संकट बघते जसे काही  हॉस्पिटल चा खर्च,  कधीकधी बऱ्याच व्यक्तींचे पर्सनल लोन,कार लोन, होम लोन इत्यादींचे ईएमआय चालू असतात व अचानक काही कारणास्तव येणारे उत्पन्न थांबते. मोठे आर्थिक संकट उभे राहते.

या सगळ्या भविष्यकालीन समस्यांवर पैशांच्या संबंधित असलेल्या चांगल्या सवयीविचारांची दिशा बदललीजाणे फार आवश्यक असते.या लेखात आपण भविष्यात येणाऱ्या आर्थिक संकटापासून आपण दूर राहू शकू अशा काही टिप्स पाहणार आहोत.

  • बचतीचा काहीभाग नेहमी लिक्विड प्रकारात किंवा रोखीमध्ये ठेवावा:

बऱ्याचदा असे होते की ती व्यक्ती आपला पैसा हा रिअल इस्टेट,विमा पॉलिसी किंवा एखाद्या व्यवसायात गुंतवितात.त्यामुळे त्यांच्याकडे रोख पैशांची कमतरता असतेकिंवापटकन पैसे काढता येतील अशा प्रकारे गुंतवणूक केलेली नसते. त्यामुळे जर एखाद्या आर्थिक संकट उद्भवले तर आर्थिक चणचण निर्माण होते.त्यामुळे असे न करता भविष्यात एखाद्या समस्या उद्भवू शकते हे ओळखून तुमच्याकडे काय काही रोख रक्कमअसणे गरजेचे आहे किंवा अशा गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करावी की तिथून गरजेच्या वेळी पैसे काढता येतील.

  • मोठे कर्ज घेणे टाळणे:

बऱ्याचदा असे होते की नोकरीमध्ये भविष्यात इन्क्रिमेंट होईल किंवा आपण करत असलेल्या व्यवसायात भविष्यात वाढ होईल अशा अंदाजांवर गृहकर्ज एखादी मालमत्ता विकत घेण्यासाठी कर्ज काढण्यात येते. मात्र होते उलटेच  बांधलेला अंदाज पूर्ण चुकतोव आर्थिक नियोजन कोलमडून पडते. त्यामुळे घेतलेल्या कर्जाच्या हप्ते  फेडणे अशक्य होते.खर्च वाढतो आणि उत्पन्न त्याप्रमाणात वाढत नाही. त्यामुळे भविष्यकालीन अंदाजावर कुठलाही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये.आपल्याला कर्जाची परतफेड करता येईल की नाही किंवा अडचण आल्यास आपल्याकडे कुठले पर्याय उपलब्ध आहेत याचा विचार करणे खूप महत्त्वाचे ठरते.

  • भविष्यकालीन वैद्यकीय खर्चासाठी तयार राहणे:

भविष्यात कुठल्याही प्रकारची वैद्यकीय समस्या उद्भवू शकते.त्यामुळे भविष्यातील वैद्यकीय खर्चाची तरतूद म्हणून नियमित काही रक्कम बचत म्हणून वेगळी काढणे गरजेचे आहे.बऱ्याचदा आपण वैद्यकीय खर्च कडे दुर्लक्ष करतो.त्यामुळे तसे न करता नियमितपणे काहीतरी बचत करणे किंवा एखाद्या चांगल्याहेल्थ इन्शुरन्स घेणे फायद्याचे ठरते.

परंतु पूर्णपणे हेल्थ इन्शुरन्स वर अवलंबून राहणे हे चांगले नाही.कोरोना काळातमोठ्या प्रमाणातील क्लेम आल्यामुळे अनेक विमा कंपन्यांनी हातआखडते घेतले. त्यामुळे तुम्ही नियमितपणे केलेली बचत तुमच्या कामी येते.

  • कर्जाला टर्म प्लानची जोड देणे:

 बऱ्याचदा गृहकर्जएखादे मोठे पर्सनल लोन घेतले असते.परंतु घरातल्या एखाद्या कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर अचानकआर्थिक संकट उद्भवते. त्यामुळेकर्जाची परतफेड करणे अशक्य होऊन जाते.त्यामुळे घेतलेल्या कर्जाच्या रकमे एवढे किंवा तितक्या कालावधीचाटर्म इन्शुरन्स घेणे योग्य ठरते.कारण असा अचानक संकट उद्भवल्यासकर्जाच्या रकमे एवढाचटर्म इन्शुरन्स घेतलेला असल्यास विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्या विम्याच्या रकमेतून कर्जाची परतफेड करता येते.

English Summary: financial tips for future financial crisis Published on: 04 September 2021, 12:39 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters