1. इतर

शेतकरी म्हणतात हा नसताच घोर! ई पीक पाहणी अँप बनले डोकेदुखी !!

KJ Maharashtra
KJ Maharashtra
शेतकरी म्हणतात हा नसताच घोर! ई पीक पाहणी अँप बनले डोकेदुखी !!

शेतकरी म्हणतात हा नसताच घोर! ई पीक पाहणी अँप बनले डोकेदुखी !!

बहुतांश शेतकऱ्यांनी ॲपद्वारे सातबारा उतारा वर पिक पेरा ची ऑनलाईन नोंद घेण्याच्या प्रक्रियेला वेग दिला आहे .ई पीक पहाणी अँप वेळोवेळी रिस्टार्ट रेंज जाणे परत येणे फोटो अपलोड न होणे आदी अडचणी निर्माण होत असल्याने अनेक शेतकरी वर्ग ऑनलाईन नोंदणी करण्याचे सोडून देण्याच्या तयारीत असल्याच्या भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.

तसेच बहुतेक शेतकरी वर्गाकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्याने त्यांना आपल्या पिकांची नोंद शासनाच्या आदेशाप्रमाणे सातबार्यावर करण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल धारकांची विनवणी करावी लागत असून अँड्रॉइड मोबाईल धारक सुद्धा अँप चांगल्या क्षमतेने व प्रत्येक गावातील नेटवर्क सपोर्ट करत नसल्याने नोंदणी करून देण्यास सुद्धा त्या शेतकऱ्याला सहकार्य करीत नाही .अशी परिस्थिती या कृषिप्रधान देशात शेतकरी वर्गाची झालेली असताना शासनाच्या या धोरणाने शेतकरी पुरता जेरीस आला असून अनेक गाव खेड्यात मोबाईल ला शेतात फोटो काढताना उपलब्ध शमते इतके सुद्धा नेटवर्क मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा हिरमोड होत आहे.

राज्य शासनाच्या महसूल विभागाने सातबारा उताऱ्यावर ऑनलाइन पिकाच्या नोंदणीसाठी “माझी शेती माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पिकपेरा “या उपक्रमा अंतर्गत ई पीक पाहणी या स्वतंत्र मोबाईल ॲप्लिकेशन ची निर्मिती केली १५ ऑगस्ट पासून हे ई पीक पाहणी हे ॲप लॉन्च केले तयार करतेवेळी राज्यात किती शेतकरी आहेत किती खातेदार किती प्रकारचे फोटो अपलोड होतील यात मध्ये इतकी समता बनविणे आवश्यक असून या तांत्रिक बाबी लक्षात घेऊन निर्मिती करणे आवश्यक होते मात्र महसूल विभागाने तसा विचार न केल्याने ई पीक पाहणी अँप मध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने सध्याच्या परिस्थितीवरून लक्षात येत असून शेतकरी पिकाची नोंदणी करण्यासाठी कमालीचे वैतागले आहेत.

 

शेतकरी वैतागले

शासनाने तलाठी यांना शेतकऱ्यांच्या अर्जानुसार पिक पेरा याची नोंद घेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे त्यामुळे ही पीक पाहणी ॲप द्वारे पिकाची नोंदणी करण्यासाठी कुठे शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्यास तलाठी, मंडळ अधिकारी ,कृषी सहाय्यक, आदी महसूल विभागातील अधिकारी मदत करतात कित्येक गाव खेड्यात ॲप मध्ये नोंदणी करण्यासाठी त्या समतेने नेटवर्क मिळत नसल्याने आणि सुरळीत चालत नसल्याने नेटवर्क अचानक गायब होणे सर्वर हळू चालणे सरोवर समोर पुढे पुढे जाण्यास अडथळा तयार होणे दोन तीन मिनीटाच्या विलंबानंतर पुन्हा परत येणे हे प्रकार अधिक वाढल्याने ॲप द्वारे नोंदणी होत नसल्याचे मानसिकता शेतकऱ्यांची झाली असून अनेक गावखेड्यात शेतकऱ्यांकडे स्वतःचे अँड्रॉइड फोन सुद्धा उपलब्ध नाहीत त्यामुळे त्यांना सुद्धा पाणी ॲपमध्ये नोंदणी करण्यासाठी अँड्रॉईड धारकाची विनवणी करावी लागत असून नेटवर्क सुरळीत चालावे हीच अपेक्षा शेतकरी वर्गाकडून होत असताना कृषिप्रधान देशात एक प्रकारे शासनाने शेतकऱ्याची व्यथा मांडण्याचा प्रकार शेतकरी वर्गाकडून विविध प्रकारच्या माध्यमांवर शोषल मीडियावर होत असून ई पीक पाहणी यावर शेतकरी वर्गाकडून नाराजीचा सूर उमटत असताना एकीकडे शासनाने दिलेली अंतिम तारीख शेतकऱ्यांना पीक नोंदणी करण्यास मजबूर करीत असून

शेतकरी वर्ग आता ई पीक पाहणी अँप मध्ये नोंदणी करण्याकडे प्रवृत्त होत असताना ॲप्स चालावे विनाविलंब चालावे अनेक गावखेड्यात विविध कंपन्यांचे नेटवर्क मिळत नसल्याने वोडाफोन जिओ एअरटेल या कंपन्यांनी सुद्धा आपले नेटवर्क ग्रामीण भागात सुरळीत पूर्ण क्षमतेने चालावा यासाठी शेतकऱ्यांना आपला पिक पेरा भरता यावा यासाठी मोबाईल नेटवर्क सुद्धा याच समतेने ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी पुढे येण्याची गरज असून शेतकऱ्यांना पिकांची नोंद करणे आता गरजेचे झाले आहे अन्यथा पीक नोंदणी न केल्यास माझा सातबार्यावर पीक नोंदणी नसल्यास सातबारा कोरा राहील का व विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होतील का या द्विधा मनस्थितीत शेतकरी असून कमालीचे त्रस्त झाले आहेत.

 

संकलन - ज्ञानेश्वर म्हस्के

प्रतिनिधी - गोपाल उगले

 

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters