1. इतर बातम्या

शेतकऱ्यांना कमी व्याजदरात मिळेल कर्ज; ३१ मार्चअखेर पर्यंत करावे लागेल 'हे' काम

शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारनं विविध कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. त्यापैकी एक आहे किसान क्रेडिट कार्ड योजना. यामध्ये शेतकऱ्यांना अगदी स्वस्त दरात कर्जपुरवठा केला जातो. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी सरकारने 31 मार्च 2021 पर्यंत एका विशेष अभियान आयोजित केले आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
kisan credit card

kisan credit card

शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारनं विविध कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. त्यापैकी एक आहे किसान क्रेडिट कार्ड योजना. यामध्ये शेतकऱ्यांना अगदी स्वस्त दरात कर्जपुरवठा केला जातो. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी सरकारने 31 मार्च 2021 पर्यंत एका विशेष अभियान आयोजित केले आहे.

याद्वारे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप या योजनेअंतर्गत आपले किसान क्रेडीट कार्ड तयार करून घेतलेलं नाही, त्यांना अगदी सहजपणे ते तयार करून घेता येणार आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अद्याप एक महिना बाकी आहे. तेव्हा ताबडतोब बँकेशी संपर्क साधा आणि किसान क्रेडीट कार्ड तयार करून घ्या.

हेही वाचा : फ्री मध्ये बनवा किसान क्रेडिट कार्ड, जाणून घ्या ! काय असते वयोमर्यादा

अर्ज केल्यापासून 15 दिवसांच्या आत मिळेल कार्ड

 

यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या बँक शाखेत (Bank) जाऊन एक साधा सोपा अर्ज भरायचा आहे. अवघ्या 15 दिवसात त्यांना त्यांचं किसान क्रेडिट कार्ड मिळेल. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज फक्त सात टक्के व्याज दरानं मिळतं. 3 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी सेवा शुल्कही माफ करण्यात आलं आहे. तसंच वेळेत कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना व्याजदरात 3 टक्के सूटही मिळते. थोडक्यात सांगायचं तर जे शेतकरी वेळेवर कर्ज फेडतात त्यांना केवळ 4 टक्के व्याज दरानं कर्ज मिळते.

 

किसान क्रेडिट कार्ड कसे बनवून घ्यावे :

 

किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी सर्वात आधी पंतप्रधान किसान योजनेच्या pmkisan.gov.in  या अधिकृत साइटवर जा.त्यानंतर किसान क्रेडिट कार्ड अर्ज डाउनलोड करा.

  • यात शेत जमीनीची कागदपत्रे, पिकाचा तपशील ही आवश्यक ती सर्व माहिती भरावी लागेल.
  • इतर कोणत्याही बँक किंवा शाखेतून किसान क्रेडिट कार्ड मिळालेले नाही याची माहितीही यात द्यावी लागेल.
  • ऑनलाइन अर्ज करू शकत नसल्यास आपल्या जवळच्या बँक शाखेत जाऊनही ही सर्व प्रक्रिया पूर्ण करता येते.

 

आवश्यक कागदपत्रे कोणती

ओळखपत्र म्हणून मतदार कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स

ओळखपत्र म्हणून दिलेले कोणतेही दस्तऐवज राहण्याच्या पत्त्यासाठीही वैध असतील.

किसान क्रेडिट कार्ड कोणतीही सहकारी बँक, क्षेत्रीय ग्रामीण बँक (आरआरबी) यांच्याकडून मिळू शकेल.

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), बँक ऑफ इंडिया (बीओआय) आणि आयडीबीआय बँक (आयडीबीआय बँक) यांच्या  कडूनही हे कार्ड घेता येईल.

हेही वाचा : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना मिळत क्रेडिट कार्ड; जाणून घ्या! काय आहे फायदा

 

किसान क्रेडिट कार्डद्वारे मिळणारी मदत

 

  • किसान क्रेडिट कार्ड धारकाच्या खात्यातील कर्जावर बचत बँकेच्या दराने व्याज दिले जाते.

  • कार्डधारकांना विनामूल्य एटीएम कम डेबिट कार्ड दिले जाते.

  • स्टेट बँक ऑफ इंडिआ किसान कार्डच्या नावावर डेबिट / एटीएम कार्ड देते.

  • तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी वार्षिक 2 टक्के दरानं व्याज सूट दिली जाते.

  • वेळेपूर्वी कर्जाची परतफेड केल्यास वार्षिक तीन टक्के दरानं व्याजात अतिरिक्त सूट मिळते.

  • किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत घेतलेल्या कर्जात पीक विमा संरक्षणही उपलब्ध आहे.

  • पहिल्या वर्षासाठी कर्जाचं प्रमाण पीक लागवड खर्च, कापणीचा खर्च आणि जमीनीची किंमत याआधारे ठरवले जाते.

 

किसान क्रेडिट कार्ड न मिळाल्यास बँकिंग लोकपालांकडे तक्रार करू शकता

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, बँकेकडं शेतकऱ्यानं अर्ज केल्यापासून 15 दिवसांच्या आत बँकेला त्या शेतकऱ्याला किसान क्रेडीट कार्ड द्यावे लागेल. त्या कालावधीत हे कार्ड दिले गेले नाही तर शेतकरी संबंधित क्षेत्राच्या बँकिंग लोकपालकडे (Banking Ombudsman) तक्रार करू शकतात. याशिवाय रिझर्व्ह बँकेच्या https://cms.rbi.org.in/ च्या अधिकृत वेबसाइटवरही तक्रार दाखल करता येईल. शेतकरी किसान क्रेडिट कार्ड हेल्पलाईन क्रमांक 0120-6025109 / 155261 वर संपर्क साधू शकतात किंवा pmkisan-ict@gov.in या वेबसाइटवरही तक्रार नोंदवू शकतात.

English Summary: Farmer will get loan in less interest Published on: 05 March 2021, 09:11 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters