1. इतर

ही इलेक्ट्रिक सायकल देणार दुचाकीला टक्कर, जाणून घेऊया सायकली बद्दल

electric cycle

electric cycle

 दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला  पोहोचत आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. त्यामुळे दुचाकी वापरणे देखील परवडण्यासारखे राहिले नाही. त्यामुळे आता बराचसा ट्रेंड हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. व त्यादृष्टीने बऱ्याच कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणले आहेत. याच पार्श्वभूमीवर असेच एक इलेक्ट्रिक सायकल लॉन्च करण्यात आली आहे.हीइलेक्ट्रिक सायकल दुचाकीला टक्कर देईल इतकी सक्षम  बनवण्यात आली आहे. या लेखात आपण या इलेक्ट्रिक सायकल विषयी माहिती घेऊ.

 जाणून घेऊया इलेक्ट्रिक सायकल बद्दल

 टाटा इंटरनॅशनल लिमिटेड च्या मालकीच्या असणाऱ्या स्ट्रायकर ने दोन इलेक्ट्रिक सायकल बाजारात लॉन्च केले आहेत. या सायकल द्वारे तुम्ही अवघ्या तीस पैशांमध्ये पाच किलोमीटरचे अंतर पार करू शकता. स्कायटरणे contino ETB 100 आणि voltic 1.7 या दोन सायकल भारतीय बाजारपेठेत लॉंच केले आहेत. या सायकली मधली contino ETB 100ही सायकल खास शहरी भागातील तरुणांवर फोकस करून बनवण्यात आली आहे.

ती सायकल एकदा चार्ज केल्यानंतर साठ किलोमीटर पर्यंतचा प्रवास करते. या सायकलमध्ये स्मार्ट सेफ्टी फीचर्स असून 7 स्पीड आणि तीन राईड मोड देण्यात आले आहेत या सायकलीची किंमत 36 हजार 999 रुपये असून काळ्याआणि निळ्या रंगात सायकल उपलब्ध आहे.

Voltic 1.7 सायकल ची वैशिष्ट्ये

  • या सायकलीची किंमत 29 हजार 995 रुपयेठेवलीआहे.
  • हे सायकल ग्रे आणि रेड कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
  • या सायकली मध्ये शक्तिशाली मोटर आणि लिथियम आयन बॅटरी बसवण्यात आली आहे.
  • या सायकल ची बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी तीन तास लागतात.
  • एकदाही सायकल चार्ज झाल्यानंतर 25 ते 28 किलोमीटर पर्यंत धावते
  • या सायकलचा प्रति तास वेग हा 25 किलोमीटर आहे.
  • या सायकली वर कंपनी दोन वर्षाची वारंटी ही देत आहे.

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters