1. इतर

शेतकरी सन्मान निधीचा पैसा नाही मिळाला, तर डायल करा 'हा' टोल फ्री नंबर

KJ Staff
KJ Staff


छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळावा,यासाठी मोदी सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली होती. फेब्रुवारी २०१९ मध्ये गोरखपूर येथील शेतकरी मेळाव्यात पंतप्रधान मोदींनी या योजनेचा पहिला हफ्ता  शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रन्सफर केला होता. त्यावेळी १२ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २५ हजार कोटी रुपये ट्रन्सफर करण्यात आले होते. या योजनेचा दुसरा टप्पा काही दिवसांपुर्वी पार पडला आहे.

मोदी सरकारने दुसऱ्या टप्प्यात देशातील ३.३६ कोटी शेतकऱ्यांना पहिला हफ्ता दिला असून प्रत्येकी दोन हजार रुपये दिले आहेत. दरम्यान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नसेल, अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने एक टोल फ्री नंबर जारी केला आहे. जर आपल्याला या योजनेचा पैसा अजून मिळाला नाही तर आपण कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करावा. संपर्क करुनही आपली समस्या सुटली नाही तर तुम्ही केंद्रीय कृषी मंत्रालायाशी संपर्क करू शकता. केंद्रीय कृषी मंत्रालयाने जारी केलेला टोल फ्री हेल्पलाईन नंबर (PM-Kisan Helpline 155261 किंवा 1800115526 या नंबरवर आपण संपर्क करु शकता. जर येथेही आपली समस्या ऐकली गेली नाही तर आपण 011-23381092 या दुसऱ्या नंबरवर कॉल करु शकता. 

या योजनेसाठी कसा कराल अर्ज

योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईट म्हणजे www.pmkisan.gov.in/ वर जाऊ पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी स्वत:ची नोंदणी करावी.

https://www.pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx या लिंकवर शेतकऱ्यांना स्वत:ची नोंदणी करावी लागेल. याशिवाय शेतकरी आपल्या जवळील महसूल अधिकारी किंवा राज्य सरकार द्वारा पंतप्रधान-शेतकरी योजनेसाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याशी संपर्क करु शकता. किंवा आपल्या जवळील सेवा केंद्रावर तुम्ही जाऊ शकतात आणि तेथे तुम्ही किमान समर्थन योजनेसाठी अर्ज करु शकता.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • बँक खाते क्रमांक
 • सातबारा दाखला
 • रहिवाशी दाखला

नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी www.pmkisan.gov.in/ वर अर्ज करावा आणि अर्ज, देयक आणि इतर तपशीलाची स्थिती नेहमी तपासावी. पंतप्रधान शेतकरी पोर्टलवर 'पोर्टल शेतकरी कॉर्नर' या पर्यायामध्ये काही सुविधा आहेत. त्या पुढीलप्रमाणे

 • नवीन शेतकरी नोंदणी
 • आधारविषयीची माहिती संपादित करा
 • लाभार्थ्यांची स्थिती
 • लाभार्थ्यांची यादी
 • स्वत:ची नोंदणी/सीएससी शेतकरी स्थिती

पंतप्रधान शेतकरी स्थिती आणि लाभार्थ्यांची यादींची चौकशी कशी कराल

 • पंतप्रधान शेतकरी या www.pmkisan.gov.in/ अधिकृत वेबसाईट वर जा.
 • मेनू बार मधील शेतकरी कॉर्नरवर क्लिक करा.
 • आता त्या लिंकवर क्लिक करा ज्यात लाभार्थींची स्थिती आणि लाभार्थ्यांची यादीत आपण चौकशी करु शकता.
 • चौकशी करताना आपले राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, तालुका, गावाचे नाव टाका.
 • मग अहवाल प्राप्त करा वरती क्लिक करा.

पंतप्रधान शेतकरी लाभार्थींची स्थिती येथे पाहा https://bit.ly/2TvLBPi
पंतप्रधान शेतकरी लाभार्थ्यांची यादी येथे पाहा https://bit.ly/2TvQYxV

स्वत: नोंदणी/सीएससी शेतकऱ्यांच्या स्थितीची चौकशी येथे करा https://bit.ly/2VSYdBm

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters