1. इतर बातम्या

आदिवासी कुटुंबांच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवड योजना

राज्यातील 13 जिल्ह्यांतील आदिवासी भागातील कुपोषण प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने व आदिवासी बांधवांना पौष्टिक आहार पुरविण्यासाठी, आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत पौष्टिक भाजीपाला व फळांची निवड करून लागवड करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी कुटुंबांच्या परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवड ही योजना राज्यात सन 2003-04 पासून राबविण्यात येत आहे.

KJ Staff
KJ Staff


राज्यातील 13 जिल्ह्यांतील आदिवासी भागातील कुपोषण प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने व आदिवासी बांधवांना पौष्टिक आहार पुरविण्यासाठी, आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत पौष्टिक भाजीपाला व फळांची निवड करून लागवड करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी कुटुंबांच्या परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवड ही योजना राज्यात सन 2003-04 पासून राबविण्यात येत आहे. 

सन 2018-19 साठी या योजनेत राज्यातील ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर व अमरावती या 13 जिल्ह्यांचा समावेश आहे.

लाभार्थी निवडीचे निकष:

  • ज्या आदिवासी गावांमधील कुटुंबाकडे शेतजमीन व परसबाग उपलब्ध असेल.
  • ज्या आदिवासी कुटुंबात कुपोषित बालके असतील त्यांना प्राधान्य.

आवश्यक कागदपत्रे:

  • ७/१२ व ८ अ.
  • अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र.
  • आधार ओळखपत्र.
  • आधार कार्ड क्रमांकाशी जोडलेले बँक खात्याचे पासबुक इत्यादी.

योजनेंतर्गत प्रती आदिवासी कुटुंबाना रु. 252/- एवढा खर्च अपेक्षित आहे. लाभार्थ्यांना आवश्यकतेनुसार रोपे, कलमे व भाजीपाला बियाणे पुरविण्यात येतील. फळझाडे व भाजीपाल्याची कलमे/ रोपे ही शासकीय अथवा नोंदणीकृत खाजगी रोपवाटिकांमधून घेता येतील. यापैकी बियाणे पुरवठा महाबीजकडून करणायत येईल. सदर अनुदान थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल.

योजने संबंधित शासन निर्णय पाहण्यासाठी: सन 2018-19 मध्ये राज्यातील आदिवासी जिल्ह्यामध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवडीची योजना राबविण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत

योजनेंतर्गत लागवड करावयाची फळझाडे व भाजीपाला

  • फळझाडे: चिकू, आंबा, पेरू, कागदी लिंबू इत्यादी.
  • भाजीपाला: शेवगा, कडीपत्ता, अळू, मेथी, पालक, लाल भोपळा, दुधी भोपळा, मागणीनुसार इतर भाजीपाला जसे दोडका, गवार, वांगी इत्यादी.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी, उप-विभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी इत्यादी.

English Summary: Cultivation of Fruits and Vegetables in tribal families backyard garden Scheme Published on: 11 October 2018, 01:52 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters