1. इतर बातम्या

अशी करा ई-पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून घरबसल्या पिकांची नोंदणी

सातबारावरपिक नोंदणी करणे हे शेतकऱ्यांसाठी अतिशयमहत्वाची गोष्ट आहे.ही पिक नोंदणी पिक कर्ज किंवा संबंधित पिकाचा विमा काढायचा असेल तर त्यासाठी फार महत्त्वाचे असते.पीकनोंदणीच्या च्या आधारे बँका शेतकऱ्यांना कर्ज देतात. अतिवृष्टी किंवा तत्सम नुकसानभरपाई सुद्धा पीकनोंदणीच्या आधारित दिली जाते. आपल्याला माहिती आहे की पीक नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयाला भेट द्यावी लागते किंवा प्रत्यक्ष तलाठी प्रत्येक शेतामध्ये पिकं नोंदणी करण्यासाठी जाऊ शकत नसल्याने शेतकरी सांगतील त्या पिकाची नोंदणी सातबारा उताऱ्यावर करावी लागते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
e pik survey

e pik survey

सातबारावरपिक नोंदणी करणे हे शेतकऱ्यांसाठी अतिशयमहत्वाची गोष्ट आहे.ही पिक नोंदणी पिक कर्ज किंवा संबंधित पिकाचा विमा काढायचा असेल तर त्यासाठी फार महत्त्वाचे असते.पीकनोंदणीच्या च्या आधारे बँका शेतकऱ्यांना कर्ज देतात. अतिवृष्टी किंवा तत्सम नुकसानभरपाई सुद्धा पीकनोंदणीच्या आधारित दिली जाते. आपल्याला माहिती आहे की पीक नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयाला भेट द्यावी लागते किंवा प्रत्यक्ष तलाठी प्रत्येक शेतामध्ये पिकं नोंदणी करण्यासाठी जाऊ शकत नसल्याने शेतकरी सांगतील त्या पिकाची नोंदणी सातबारा उताऱ्यावर करावी लागते.

 यामुळे बऱ्याच पिकांचा लागवडीविषयी चुकीचा डाटा शासनापर्यंत पोहोचतो.शासनाकडून आता इ पीक पाहणी ॲप निर्माण करण्यात आले आहे जेणेकरून शासनाला पिकांच्या, फळांच्या तसेच संबंधित शेताच्या बांधावरच्या झाडांचा अचूक डाटा उपलब्ध व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे.सुरुवातीला हे ॲप्लिकेशन सात जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये सुरू करण्यात आले होते. आता ते संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आलेला आहे.यासाठी प्रत्येक तलाठ्याला  लोगिन देण्यात आले असून शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही नोंदी करण्यात आलेले आहेत त्यात शेतात घेतलेले फोटो असतील ते फोटो व्हेरिफाय करून त्याला तलाठ्याच्या  माध्यमातून अप्रूवकेले जातात.

 कशा केल्या जातात या ॲपच्या माध्यमातून नोंदी?

  • सर्वप्रथमई पीक पाहणी प्ले स्टोअर वर सर्च करून डाऊनलोड करावे.
  • यानंतर ते ओपन करूनमोबाईल नंबर मागितला जातो. त्याठिकाणी तुमचा चालू मोबाईल नंबर प्रविष्ट करा.
  • तुमचं गाव,तालुका आणि जिल्हा निवडावा.
  • त्यानंतर तुमच्या शेताचा गट नंबर टाकून किंवा खाते क्रमांक आणि आपल्या गावातील आपला नावसहजरीत्या शोधू शकता.
  • त्यानंतर तुम्ही प्रविष्ट केलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येतो. ओटीपी टाकून आपण लोगिनची शेवटची पायरी पूर्ण करतो.
  • लोगिन केल्यानंतर संबंधित प्रोफाईल वर ती माहिती भरून झाल्यानंतर तिथे उपलब्ध असलेल्या त्यापैकी पिकांची माहिती ऑप्शन वर क्लिक करावे.
  • यानंतर जर तुमचे वेगळे खाते व गट नंबर असतील तर तिथे ऑप्शन येईल.  एकच असेल तर एकच दाखवला जाईल तिथून पुढे जाऊ शकता.
  • त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे पीक निवडायचे खरीप, रब्बी यानुसार हंगामामध्ये पिकानुसार 1पीकनिवडावे.
  • यानंतर पिकाचा प्रकार निर्भळ,मिश्र,पॉलिहाऊस, शेडनेट हाऊस यामधून एका पिकांची निवड करावी.
  • त्यानंतर पीक आणि फळबाग त्यापैकी एक निवडा.
  • पिकांची, फळांची आणि कडधान्याची नावे निवडा.
  • तुमचे असलेले क्षेत्र किती आर म्हणजे एक गुंठे आहे तेभरा.
  • सिंचनाचा प्रकार दिलेले असतील त्यापैकी एक प्रकार निवडावा.
  • तुमच्या शेतात विहीर असेल तर विहीर निवडू शकता.
  • शेतातील सिंचनाची पद्धत कोणती तीटाका.
  • पिकाच्या लागवडीचा दिनांक टाका.
  • मोबाईलचा कॅमेरा चा ॲक्सेस ओके करून आपल्या पिकाचा फोटो काढून अपलोड करा आणि सबमिट वर क्लिक करा.
  • आणि शेवटी आपली माहिती भरली आहे. पिकाची नोंदणी झाली आहे अशा प्रकारचे नोटिफिकेशन मिळते.
English Summary: crop servey app help crop registration Published on: 24 August 2021, 12:23 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters