केंद्र सरकारची नवी योजना : दुकानदार अन् फेरीवाल्यांना मिळणार कर्ज

02 June 2020 04:47 PM By: भरत भास्कर जाधव


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिली मंत्रिमंडळाची बैठक घेतली.  या बैठकीत (एमएसएमई)सुक्ष्म, लघु, आणि मध्यम क्षेत्रातील तसेच रोजंदारीने काम करणाऱ्या लोकांविषयी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने दुकानदार आणि छोटे उद्योग धंदे करणाऱ्या लोकांचं आय़ुष्य बदलणार आहे. एमएसएमई हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे सरकारने म्हटलं आहे. या क्षेत्रातील अनेक जण मजबूत आणि आत्मनिर्भर भारतासाठी झटत आहेत.

हे लक्षात घेता आत्मनिर्भर भारत अभियानासाठी करण्यात आलेल्या घोषणांमध्ये या क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे.  एमएसएमईला पुरेसे अशी मदत सरकारकडून दिली जाणार आहे. गृहनिर्माण व शहरी मंत्रालयाने (Ministry of Housing and Urban )रोजंदारी करणाऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी मायक्रो क्रेडिट सुविधा योजना पीएम स्व-निधी योजना सुरू करण्यात आली आहे. याच्या माध्यमातून ते परत आपला व्यवसाय आणि आपले जीवन सक्षम बनवू शकतील.   फळविक्रेते, हातगाडीवर व्यवसाय करणारे, फेरीवाले, वेंडर अशी ५० लाख लोकांना या योजनेचा फायदा होणार आहे. शहरातील महापालिका या ही योजना यशस्वी बनविण्यास मोठी भूमिका साकारतील.यासह शेतकऱ्यांनाही सरकराने मोठा दिलासा दिला आहे. खरीप हंगामासाठी १४ पिकांची किमान समर्थन किंमत वाढविण्यात आले आहे. साधरण दीडपट इतकी एमएसपी करण्यात आली आहे. म्हणजेच १४ पिकांची किमान समर्थन किंमत ही ५० टक्क्यांहून ८३ टक्के करण्यात आली आहे.

central government government scheme hawkers and shop owner get loan दुकानदार अन् फेरीवाल्यांना मिळणार कर्ज केंद्र सरकारची नवी योजना
English Summary: central governments new scheme : hawkers and shop owner can get loan

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय









CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.