अस्पी एल. एम. पटेल फार्मर ऑफ दी इयर अवॉर्ड 2020

25 November 2019 01:30 PM


अस्पी ॲग्रीकल्चरल रिसर्च डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट फाउंडेशन’ (अस्पी) शाश्वत शेतीच्या वाढीसाठी सातत्याने कार्य करत आहे आणि ही संस्था हजारो शेतकऱ्यांना प्रेरणा देत आली आहे. समाजातील शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यास मदत करण्याच्या उद्देशाने एएसपीईई प्रयत्नशील आहे. अलीकडेच, "अस्पी एल.एम. पटेल फार्मर ऑफ द इयर 2020" पुरस्कार जाहीर केले असून त्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांनी या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी अर्ज करावेत अशी विनंती संस्थेने केली आहे.

फलोत्पादन विभाग-पपई लागवड’, ‘हिवाळी शेती विभाग-एरंडी लागवडयाचबरोबर यशस्वी महिला शेतकरी विभाग- फलोत्पादन क्षेत्रात कृषीमालाची टिकवण क्षमता कशी वाढवता येईल यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना राबवून त्यात यश मिळवलेल्या शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारामुळे आदर्श शेतकरी प्रकाशझोतात येतील. विजेत्यांना सन्मानचिन्ह, 1 लाख रुपये रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल.

अर्ज कसा करावा?

 • अस्पीच्या कार्यालयात जाऊन चौकशी करा किंवा aspeefoundation.org या संकेतस्थळावरून थेट फॉर्म डाउनलोड करा. फॉर्मची योग्य रीतीने भरलेली प्रत शेतकऱ्यांनी जपून ठेवावी.
 • नामनिर्देशन अर्ज केवळ निवड केलेल्या शेतकऱ्यांना पाठविला जाईल. खाली दिलेल्या नामनिर्देशन प्राधिकरणाची शिफारस असलेले अर्ज भरलेल्या अर्जदारांना मुंबई येथील अस्पी फाउंडेशन कार्यालयात जावे लागेल. फॉर्म तीन प्रतीत (1 मूळ + 2 नक्कल प्रती) मध्ये पाठवावा अन्यथा अर्जाचा विचार केला जाणार नाही. अस्पी फाउंडेशन यादीत नाव असलेल्या उमेदवारांशी संपर्क साधेल.
 • समितीद्वारे नामांकन अर्जांची छाननी केली जाईल आणि निवडलेल्या यादीतील शेतकऱ्यांच्या शेतात शेतकरी आणि अस्पी फाउंडेशनच्या परस्पर सोयीच्या तारखेनुसार व्हिडिओ शूटिंग करण्यात येईल.

टीप: पुरस्कार 2020 साठी नामांकन मिळालेल्या शेतकऱ्यांचे व्हिडिओ शूटिंग 2020-21 मध्ये केवळ पिक कालावधी / कापणी दरम्यान घेण्यात येईल. सन 2020 मध्ये व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी पुरस्कारासाठी निवडली गेलेली पिकेही निवड झालेल्या शेतकऱ्यांनी घ्यावीत.

महत्त्वाच्या तारखा

 • प्राथमिक अर्ज भरण्याची अंतिम तारीख - 15 डिसेंबर 2019 आणि
 • अस्पी फाउंडेशन कार्यालयात नामनिर्देशन अर्ज भरण्याची अंतिम तारीख - 15 मे 2020 आहे.

पात्रता

फलोत्पादन श्रेणी–पपई लागवड आणि हिवाळी शेती श्रेणी-एरंडी लागवड’

 • अर्जदार शेतकऱ्याचे कमीत कमी 1 एकर क्षेत्र पपई लागवडीखाली एकाच ठिकाणी असले पाहिजे.
 • या पिकाचे किमान तीन वर्ष आधीपासून तरी उत्पादन व्हायला हवे.

फलोत्पादन क्षेत्रात कृषीमालाची टिकवण क्षमता कशी वाढवता येईल यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना राबविनाऱ्या महिला शेतकरी

 • कृषीमालाची टिकवण क्षमता वाढविण्यासाठी शेतकऱ्याकडे कमीत कमी 2 ते 3 नवीन कल्पना असणे आवश्यक आहे.
 • मागील 3 वर्षांपासून त्याचा अवलंब केला असावा.
 • फळे आणि भाज्यांची टिकवण क्षमता वाढविण्यासाठी स्वत: हून कल्पना विकसित केल्या पाहिजेत किंवा त्यात सुधारणा केलेली असली पाहिजे.
 • हे तंत्रज्ञान व्यावसायिक असावे.

निवडीचे निकष:

पात्रतेव्यतिरिक्त पुढील गोष्टींवर विशेष भर दिला जाईल

 • आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून निविष्ठा, संसाधने, पाणी, जमीन इत्यादींचा कार्यक्षम व प्रभावी वापर करण्याची आवश्यकता.
 • नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत इतर शेतकऱ्यांना मदत व मार्गदर्शन करणारा हा एक आदर्श शेतकरी असावा.
अस्पी एल.एम. पटेल फार्मर ऑफ द इयर 2020 Aspee L. M. Patel Farmer of the Year Award 2020 Aspee अस्पी अस्पी ॲग्रीकल्चरल रिसर्च डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट फाउंडेशन ASPEE Agricultural Research & Development Foundation एरंडी castor papaya पपई
English Summary: Aspee L. M. Patel Farmer of the Year Award 2020

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.