टपाल कार्यालयात करा पीक विम्याचा अर्ज ; आवास योजनेसह मिळेल ७३ सुविधांचा लाभ

08 September 2020 04:22 PM By: भरत भास्कर जाधव


आता शासकीय योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. योजनेसाठी कसा  अर्ज करावा. कुठून करावा या समस्या राहणार नाहीत. कारण टपाल विभागाने (Department Of Post)  एक योजना आणली आहे, या योजनेमुळे टपाल कार्यालयात केंद्र सरकारचे कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC)  सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे केंद्र आणि  राज्य सरकारची सामन्य नागरिकांसाठी असलेल्या ७३ सुविधांचा लाभ मिळणार आहे.   दरम्यान बिहारमध्ये  ३०० टपाल कार्यालयात पोस्ट ऑफिस कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

पंतप्रधान  यांच्या योजनांशी संबंधित सर्व योजनांची नोंदणी टपाल कार्यालयात सुरु करण्यात येणाऱ्या  सीएससी मध्ये केली जाईल. जर प्रधानमंत्री  जनधन खाते उघडायचे असेल  किंवा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची नोंदणी करायची असेल सर्व योजनांची नोंदणी येथे केली जाईल.  इतकेच नाही तर शेतकरी  पीक विम्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनांता लाभही घेऊ शकतील. पंतप्रधान आवास योजनेची  नोंदणीही केली जाणार आहे.

याशिवाय  या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये आधार कार्ड बनवता येणार यासह   आधार कार्डचे अपडेट केले जाणार आहे. मृत्यू प्रमाणपत्र ग्रामपंचायत किंवा नगरपालिका, महानगरपालिकेत मिळत असते. परंतु  टपाल कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्येही हे प्रमाणपत्र मिळणार आहे.  पेन्शन धारकांनाही दर वर्षी जीवन प्रमाणपत्र (Life certificate)  द्यावे लागते. आता हे प्रमाणपत्र टपाल कार्यालयात मिळणार आहे. यासह पाणी आणि वीज बिल, गॅसचे बिल पण येथे जमा केले जातील. इतकेच काय राष्ट्रीय महामार्गावरील टोल देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक  फास्टॉगचा रिचार्ज येथे केले जाईल.

electricity bills crop insurance post office Department Of Post CSC कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्र सरकार टपाल कार्यालय प्रधानमंत्री जनधन खाते Prime Minister Jand han Account पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना Pradhan Mantri Jeevan Jyoti Vima Yojana Life certificate जीवन प्रमाणपत्र
English Summary: Apply for crop insurance at the post office; Benefit of 73 facilities along with housing scheme

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.