शेतमाल तारण योजना : राज्यातील साडेतीन हजार शेतकऱ्यांनी घेतला लाभ

Wednesday, 12 August 2020 04:29 PM


शेतमालाच्या काढणीनंतर  बाजारपेठेत एकाचवेळी  शेतमाल आल्यावर घसरणाऱ्या दारांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी  राज्य पणन मंडळाच्या  वतीने  शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे.  या योजनेत  जुलैअखेर ३ हजार ६४२ शेतकऱ्यांनी  सुमारे १ लाख ६१ हजार क्किंटल शेतमाल ठेवला आहे. तर सुमारे ३५ कोटी ९२ लाखांचे कर्ज शेतकऱ्यांनी घेतले, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संचालक सुनिल पवार यांनी माध्यामांना दिली.

राज्य कृषी मंडळाद्वारे शेतमाल  तारण कर्ज योजनेअंतर्गत बाजार समित्या अथवा गोदामात महामंडळाच्या गोदामांत ठेवण्यात येणाऱ्या  शेतमालाच्या एकूण किमतीच्या ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम कर्ज  स्वरुपात  ६ महिन्यांसाठी ६ टक्के व्याज दराने दिली जाते. या योजनेत तूर, मूग, सोयाबीन , सूर्यफूल, हरभरा, भात,. करडई, ज्वारी, बाजरी , मका, गहू, घेवडा, काजू, बेदाणा, सुपारी व हळद या पिकांचा समावेश आहे.

जर आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसेल आणि आपण बाजारदर सुधारे पर्यंत माल ठेवायचा असेल तर ही योजना आपल्यासाठी चांगली आहे. पंरतु अनेक शेतकऱ्यांकडे शेतमाल ठेवण्यासाठी पुरेसा साधन नसते, गोदाम, जागा नसते. यामुळे मिळेल त्या दरात शेतमाल शेतकरी विकत असतो. पण शेतकरी मित्रांनो घाबरु नका आपल्याकडे जर  शेतमाल असेल तर आपण या योजनेच्या माध्यमातून आपला शेतमाल शासकिय गोदामात ठेवू शकता. याशिवाय या शेतमालावर आपण पैसाही मिळवू शकतात.

शेतकऱ्याकडे शेतमाल साठवण्यासाठी पुरेशी साठवणूक व्यवस्था असेल तर साठवलेला शेतमाल बाजारात जेव्हा मालाची आवक कमी असते तेव्हा माल बाजारात विक्रीसाठी आणता येते व शेतमालाला चांगला भाव मिळून चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.  या दृष्टिकोनातून कृषी पणन मंडळ सन 1990-91 पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे.  सदर योजना कृषी उत्पन्न बाजार समित्या मार्फत राबविण्यात येते.   या योजनेत तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल, भात तर धान्यामध्ये ज्वारी, बाजरी मक्का, गहू, काजू हळद इत्यादी शेतमालाचा समावेश सदर योजनेत करण्यात आला आहे. या अनुषंगाने शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात शेतमाल ठेवण्याची सोय केली जाते. 

शेतकऱ्यांना कसा मिळतो पैसा –

या योजनेतून शेतकरी आपला शेतमाल गोदामात ठेवत असतो.  ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम महिन्याच्या कालावधीसाठी मिळते. सहा महिन्यासाठी मिळणाऱ्या रक्कमेवर ६ ट्क्क्यानुसार व्याज आकरले जाते. शेतमाल ठेवल्यानंतर शेतकऱ्यांना त्याची पावती दिली जाते. सहा महिन्याच्या आत कर्जाची परतफेड करणाऱ्या बाजार समित्यांना व्याज दरात तीन टक्के व्याज सवलत देण्यात येते.

 

 

काय आहेत शेतमाल तारण  योजनेची वैशिष्टये आणि अटी

 

  • या योजनेत फक्त उत्पादित शेतकऱ्यांचा शेतमाल तारण म्हणून ठेवण्यात येतो. व्यापाऱ्यांचा माल येथे स्वीकारला जातं नाही.
  • तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत त्या दिवसाचे बाजारभाव किंवा शासनाने जाहीर केलेले खरेदी किंमत यापैकी जी कमी असेल ती ठरविण्यात येते. 
  • तारण कर्जाची मुदत सहा महिने असून तारण कर्जाचा व्याजाचा दर सहा टक्के असतो.
  • बाजार समितीकडून कृषी पणन मंडळास तीन टक्के प्रमाणे कर्ज व्याजाची परतफेड. (उर्वरित तीन टक्के व्याजबाजार समितीस प्रोत्सहानपर अनुदान ).  मुदतीत कर्जाची परतफेड ना केल्यास व्याज सवलत मिळत नाही.
  • सहा महिन्याच्या  मुदतीनंतर आठ टक्के व्याज दर व त्यांच्यापुढील सहा महिन्याकरिता बारा टक्के व्याज या दराने आकारणी केली जाते.
  • शेतकरी जो शेतमाल तारण म्हणुन ठेवतो त्या शेतमालाचा संपूर्ण विमा उतरवण्याची जबाबदारी संबधीत बाजार समितीची असते.
  •   ज्वारी, बाजरी मक्का व गव्हासाठी कर्ज रक्कम एकूण किमतीच्या 50 टक्के रक्कम सहा महिने या कालावधी साठी सहा टक्के या व्याज दराने दिली जाते.

Agricultural Mortgage Scheme शेतमाल तारण योजना farmers शेतकरी शेतमाल agriculture goods Sunil Pawar Executive Director Marketing Board पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संचालक सुनिल पवार
English Summary: Agricultural Mortgage Scheme : Benefit taken by 3,642 farmers in the state

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.