1. इतर बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मोदीसरकार देणार सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड जाणुन घ्या तपशीलवार

शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी,हो शेतकऱ्यांना सरकार लवकरच आनंदाची बातमी देणार आहे. असं सांगितलं जात आहे की 2022 पर्यंत मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा करणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या मते, सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जाईल. ते म्हणाले की, किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) साथीच्या काळातही म्हणजे ह्या कोरोनाच्या काळातही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
kisaan credit card

kisaan credit card

शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी,हो शेतकऱ्यांना सरकार लवकरच आनंदाची बातमी देणार आहे. असं सांगितलं जात आहे की 2022 पर्यंत मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा करणार आहे.

 केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या मते,

सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जाईल.  ते म्हणाले की, किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) साथीच्या काळातही म्हणजे ह्या कोरोनाच्या काळातही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.

 ते म्हणाले की, सरकार फेब्रुवारी 2020 पासून सर्व शेतकऱ्यांना केसीसी अंतर्गत आणण्याची एक मोहीमच राबवत आहे. तोमर यांच्या मते, पीएम किसान (पीएम किसान सन्मान निधी योजना 2021) च्या लाभार्थ्यांकडे विशेष लक्ष दिले जात आहे.  ते म्हणाले की, चालू आर्थिक वर्षासाठी 16 लाख कोटी रुपयांच्या कर्जाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. केसीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 14 लाख कोटी रुपयांचे कर्ज आधीच दिले गेले आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी केंद्रीय योजनांचा लाभ योग्य शेतकऱ्यांपर्यंत नेण्यावर भर दिला. तोमर यांनी सर्व केंद्रशासित प्रदेशांच्या लेफ्टनंट गव्हर्नर आणि प्रशासकांना सांगितले की, केंद्रीय योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी आणि पैशांची कमतरता अडथळा बनू नये. ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे.

किसान क्रेडिट कार्डचा नेमका फायदा काय?

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की या कार्डावर, शेती संबंधित कामासाठी अतिशय कमी व माफक दरात कर्ज मिळते. सरकार केसीसीद्वारे शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज देते.  कर्जावरील व्याज 9 टक्के असले तरी त्यावर 2% सबसिडी आहे. म्हणुन, कर्जावर फक्त 7 टक्के व्याज भरायचे आहे. आणि अजून एक चांगली गोष्ट अशी आहे की जर

कर्जाची वेळेपूर्वी परतफेड केली गेली तर व्याजावर 3 टक्के पर्यंत सूट देखील मिळते. म्हणजेच एकूण व्याजाच्या फक्त 4 टक्के रक्कम भरायची असते.

 पीएम किसानसाठी रजिस्ट्रेशन कसे करणार?

राज्य सरकार पीएम किसानचे लाभार्थी बनण्यास मदत करते. आपण यासाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकारी किंवा पटवारीकडे अर्ज करू शकता. याशिवाय कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) द्वारेही नोंदणी करता येते.  याशिवाय, या योजनेसाठी अर्ज पीएम किसान पोर्टलद्वारे देखील करता येईल.

 

रेजिस्ट्रेशनसाठी Https://pmkisan.gov.in/ वर जा.

 

Farmers कॉर्नर हा पर्याय दिसेल.

 

 

यामध्ये 'New Farmer Registration' चा पर्याय आहे, तिथे क्लिक करा.

 

एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकावा लागेल.

 

आधार क्रमांक भरून काही तपशील भरावा लागेल.

 

नावावर नोंदणी केलेल्या जमिनीचा तपशीलही द्यावा लागेल, आता फॉर्म सबमिट करा, मोबाईलवर अर्जाची माहिती कळेल.

 Source-Dainik Jagran

 

 

English Summary: central gov.give kisaan credit card to farmer Published on: 18 September 2021, 09:48 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters