फळे आणि भाजीपाल्याची विक्री करणारी मदर डेअरीची शाखा सफल ने झुमाटोशी करार केला आहे. या करारातून दिल्ली – एनसीआरच्या काही भागातील ग्राहकांना घर पोहच भाज्या आणि फळे देणार आहे. सुरुवातीला दिल्ली-एनसीआरमधील ११ बूथवरून डिलिव्हरी केली जाणार आहे. या क्षेत्रात सफल बूथ स्टॉकची उपलब्धता सुनिश्चित करणार तर झुमाटो उपभोक्ताच्या दारापर्यंत फळे आणि भाजीपाला देणार असल्याचे मदर डेअरीकडून सांगण्यात आले. ग्राहक झुमाटोच्या एप्लिकेशनच्या माध्यमातून भाजीपाल्याची ऑडर देऊ शकतील, असे विज्ञप्ति म्हणाले. मदर डेअरीच्या फ्रुट्स एंड व्हेजिटेबल्स प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमुख प्रदीप्त साह म्हणाले की, सफल ने झुमाटोसह करार करून होम डिलीव्हरीचा पर्याय सुरू केला आहे. आपल्या ग्राहकांना गुणवत्ता आणि सुरक्षित भाजीपाला आणि फळे देण्यासाठी जागृक असून सावधानगिरी बाळगत आहोत.
सुरुवातीला दिल्ली, साकेत, वसंत कुंज, द्वारका, जनकपूरी आणि पंचशील एन्कलेव, तसेच नोएडा सेक्टर ५० आणि सेक्टर २९ या भागात ही सुविधा सुरू केली जाईल. सुरुवातील ११ बूथ मध्ये डिलिव्हरी होणार – सफल ने दिल्ली – एनसीआर च्या काही भागातील ११ बूथपासून डिलिव्हरी केली जाणार आहे. या क्षेत्रातील सफल बूथ पुरवठाची उपलब्धता सुनिश्चित करतील. तर झुमाटो ग्राहकांना घर पोहोच भाज्या आणि फळे देणार आहेत. प्रत्येक सफल आऊटलेट १० किलोमीटरच्या अंतर्गत राहणाऱ्या ग्राहकांना ही डिलिव्हरी केली जाणार आहे. या सुविधेच्या लाभ घेण्यासाठी ग्राहक आपल्य झुमाटोच्या एप्लिकेशन माध्यमातून ऑडर देऊ शकतात. ज्याप्रमाणे ते खाण्याचे ऑर्डर देत असतात त्याप्रमाणे ते ही ऑर्डर देऊ शकतात.
दरम्यान एफएमसीजी क्षेत्रातील प्रमुख कंपन्या आयटीसीने पण अशा उपक्रम सुरू केले आहेत. कंपन्यांनी डाळ सारख्या आवश्यक वस्तूंची होम डिलीव्हरीसाठी डोमिनोज पिज्जा सोबत करार केला होता. यासह स्विगी, झुमाटो सारख्या कंपन्यांनी इतर एफएमसीजी कंपन्यांनी करार केला आहे. ई-कॉमर्स ब्रांड फ्लिपकार्टने पण सूपरमार्ट चेन विशाल मेगा मार्टसह करार केला होता.
Published on: 18 June 2020, 04:34 IST