अहमदनगर- घरात आर्थिक सुबत्ता असूनही अनेक शेतकरी पुत्रांना विवाहासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. नोकरदारापेक्षा आर्थिक सक्षम असूनही केवळ शेती करतो म्हणून मुलाला नकार दिला जातो. त्यामुळे ग्रामीण भागात अविवाहित शेतकरी पुत्रांची संख्या आजही मोठ्या प्रमाणावर दिसून येते. मात्र, नांदगाव तालुक्यातील शेतकरी पुत्राने पुढाकार घेऊन नवा आदर्श निर्माण केला आहे. शिर्डी येथील अनाथालयातील मुलीशी विवाह करण्याचा निर्णय घेतला.
योगेश आहेर असे शेतकरी पुत्राचे नाव असून त्याने अनाथलयाच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधून आपल्या आर्थिक सक्षमतेची माहिती दिली. दोन्ही बाजूंच्या संमतीनंतर योगेश व महेश्वरी या दोघांचा विवाह मोठ्या दिमाखात संपन्न झाला. रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमानं जपलेली नाती श्रेष्ठ असतात याची साक्ष या विवाहानिमित्ताने सर्वांना आली.
नोकरदाराला भारी, शेतकऱ्याची स्वारी:
योगेश यांच्या घरी बागायती शेती आहे. आठ एकर शेतीत विविध प्रयोग केले जातात
तसेच शेतीला दुग्धव्यवसायाची जोड देखील देण्यात आली आहे. दिवसाकाठी शंभर लीटर दूध डेअरीला पाठविले जाते. शेती व दुग्धव्यवसाय यांच्याजोरावर योगेश यांचा आर्थिक गाडा सुस्थितीत चालतो. मात्र, केवळ नोकरी करणाराच मुलगा हवा म्हणून त्यांना आजवर लग्नासाठी नकार देण्यात आले होते.
Published on: 18 September 2021, 09:35 IST