मुंबई- किसान क्रेडिट कार्ड(KISAN CREDIT CARD) द्वारे शेतकऱ्यांना कर्जाचा पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांना अल्पकालीन कर्जाचा पुरवठा करण्यासाठी 1998 मध्ये सरकारद्वारे या योजनेचा आरंभ करण्यात आला.
पंतप्रधान किसान क्रेडिट कार्ड ही आता प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान) सोबत जोडण्यात आली आहे. शेतकऱ्यांना 4% व्याजदराने 3 लाख रुपयांपर्यंत कर्जाचा पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांना पीएम किसान लाभार्थी होणे अत्यंत सोपे आहे.
पीआयबीच्या माहितीनुसार, कोविड कालखंडात 2 कोटीहून अधिक किसान क्रेडिट कार्ड जारी करण्यात आले. त्यापैकी बहुतांश कार्ड छोट्या शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आले.
हेही वाचा : किसान क्रेडिट कार्ड,एसबीआयकडे शेतकऱ्यांसाठी आहे ही ऑफर
कृषी, मत्स्यव्यवसाय, पशुपालन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शेतकऱ्यांना या लोनचा फायदा प्राप्त होईल. याद्वारे कर्जाचा मिळणारा व्याजदर अन्य बँका सापेक्ष मिळणाऱ्या दरापेक्षा निश्चितच कमी आहे. हंगामाच्या कालावधीनुसार शेतकऱ्यांकडून व्याजाची आकारणी केली जाते.
PM किसान योजना ही किसान क्रेडिट कार्ड (केसीसी योजना) सोबत लिंक केल्यानंतर शेतकऱ्यांना केवायसी करण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी केवळ एक पानाचा अर्ज भरण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना हा अर्ज पुढील वेबसाईटवर उपलब्ध असेल: pmkisan.gov.in
KCC साठी अर्ज करण्यापूर्वी ‘या’ बाबी महत्वाच्या:
किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे वय 18 ते 75 यादरम्यान असावे. 60 वर्षाहून अधिक वयाच्या अर्जदाराला अर्ज करतेवेळी सह-अर्जदाराची आवश्यकता असेल.
Published on: 14 October 2021, 10:09 IST