बळीराजा आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड करतो यामध्ये कांदा, ज्वारी, बाजरी, ऊस, कापूस, मूग इत्यादी पिकांची लागवड करतो. तर काही शेतकरी फक्त नगदी पिकांची लागवड करतात. नगदी पिकांमधून शेतकरी मोठ्या प्रमाणात नफा मिळवतात शिवाय या मध्ये कष्ट सुद्धा इतर पिकांपेक्षा कमी करावे लागते.आजच्या युगात आधुनिक तंत्रज्ञान वापर आणि विकसित तंत्रज्ञान वापरून आपण शेतीमध्ये अनेक अशक्य गोष्टी शक्य करू शकतो. तर पाम हे एक नगदी पीक आहे. एक फायदेशीर व्यवसाय म्हणून सुद्धा पाम ची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते आणि त्यापासून बक्कळ असे पैसे सुद्धा कमावले जातात.
पाम शेतीमधून शेतकरी 12 महिने त्यातून उत्पादन घेऊ शकतो तसेच त्याच्या माध्यमातून बक्कळ पैसे सुद्धा कमवू शकतो. पाम तेलाला गोल्डन पाम असे सुद्धा ओळखले जाते. सध्या आपल्या देशातील 50,000 हेक्टर क्षेत्र पाम तेलाच्या झाडांची लागवडी खाली आहे तसेच पामची शेती 15 हुन अधिक राज्यांमध्ये केली जाते.पाम च्या पिकासाठी उपयुक्त जमीन:- पाम हे पावसावर अवलंबून असलेले झाड आहे. कोणत्या ही प्रकारच्या मातीमध्ये पाम ची लागवड करता येऊ शकते. रोग लागवडीसाठी या रोपांना 1मिटर मातीची खोली असणे गरजेचे असते. वाळूयुक्त आणि क्षारयुक्त जमिनीत पाम ची लागवड करू नये.
लागवडीसाठी जमीन कश्या प्रकारे तयार करावी:-
1) पाम लागवडीसाठी जमीन नेहमी स्वच्छ असावी तसेच शेतातीप सर्व तण काढून घ्यावे.
2)लागवडीआधी जमीन एकदम भुसभुशीत करून घ्यावी.
3)पाम ची लागवड ही जून ते डिसेंबर या महिन्यात करावी लागते.
पाम लागबडीपासून होणारे फायदे:-
पाम ची लागवड ही शेतकरी वर्गासाठी खूप फायदेशीर आहे. आपल्या देशात सर्वाधिक खाद्यतेल हे पाम तेलापासून मिळते शिवाय बाजारात पाम ला प्रचंड प्रमाणात मागणी आहे. तसेच पाम तेल पीक कीड आणि रोगांना कमी धोका आहे. वाढत्या तेलाच्या मागणी मुळे बाजारात पाम ला मोठी मागणी आहे. शिवाय भाव सुद्धा चांगला असल्याने शेतकरी वर्गाला मोठा फायदा होत आहे.
प्रक्रिया:-
1) पाम ची लागवड ही बियाणांच्या माध्यमातून केली जाते.
2)लागवडी च्या आधी पाम च्या बिया 3ते 4 दिवस पाण्यात भिजू घालाव्यात.
3) पाम च्या बियाणांची उगवण 10 दिवसात होते. त्यानंतर त्याची लागवड करावी.
Published on: 05 February 2022, 06:11 IST