आधार कार्ड फ्रॅंचाईजी द्वारे कोणीही मोठी कमाई करू शकतात. परंतु बऱ्याच जणांना याबाबत माहिती नाही की, फ्रॅंचाईजी कुठून आणि कशी मिळते. तर पाहूया याबद्दलची माहिती.
आताच्या काळात आधार कार्ड भारतीय नागरिकांसाठी एक महत्वाचे कागदपत्र पैकी एक आहे. बँकेत खाते उघडण्या पासून तर पासपोर्ट बनवण्या पर्यंत कोणत्याही प्रकारच्या सरकारी कामासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड मध्ये दिलेली माहितीही बरोबर असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आधार कार्ड बनवणे आणि त्यामध्ये दिलेली माहिती जर चुकीचा असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी आदर्श सेंटर ची आवश्यकता भासते. या आधार सेंटर सला कॉमन सर्विस सेंटर या युआयडीएआय फ्रेंचायसी म्हणतात.
आधार केंद्राच्या फ्रॅंचाईजी मधून कसे होऊ शकते कमाई?
आधार सेंटर फक्त लोकांना सुविधा प्रदान करत नाही तर एक रोजगाराची छानशी संधी निर्माण करते. तुम्ही सुद्धा आधार कार्ड फ्रॅंचायजी घेऊन मोठ्यात मोठी कमाई करू शकतात. परंतु बऱ्याच प्रमाणात लोकांनाही माहिती नाही की, हे फ्रॅंचाईजी कशी आणि कुठून मिळते. हे फ्रेंचायसी घेऊन तुम्ही चांगली कमाई करू शकता.
आधार केंद्राची फ्रेंचायसी कशी घ्यावी?
आधार केंद्राची फ्रॅंचाईजी घेण्यासाठी तुम्हाला यूआयडीएआय द्वारा आयोजित परीक्षा द्यावी लागते. परीक्षा पास केल्यानंतर पास झालेल्यांना आधार सर्विस सेंटर उघडण्याचे लायसन्स दिले जाते. ही परीक्षा सर्टिफिकेशन साठी घेतली जाते. जे व्यक्ती परीक्षेमध्ये पास होते त्याच्यावर कमेंट आणि बायोमेट्रिक केले जाते. त्यानंतर कॉमन सर्विस सेंटर मध्ये रजिस्ट्रेशन केले जाते.
हेही वाचा :Kisan Credit Card: ड्यु डेट पर्यंत पेमेंट न केल्याने काय होते ? जाणुन घ्या कर्जाच्या अटी
आधार केंद्राच्या फ्रेंचायसी रजिस्ट्रेशन करण्याची पद्धत
आधार फ्रेंचायसी साठी तुम्हाला लायसन्स मिळवणे फार आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला
1-सर्वप्रथम NSEIT https://uidai.nseitexams.com/UIDAI/LoginAction-input.action) या वेबसाईटवर जावे लागेल. येथे तुम्हाला सगळ्यात आगोदर क्रियेट न्यू यूजर वर क्लिक करावे लागेल.
2- त्यानंतर एक फाईल तुमच्यासमोर उघडेल. येथे तुम्हाला एक कोड शेअर करण्यासाठी सांगितला जातो. शेअर कोड साठी तुम्हाला https://resident.uidai.gov.in/offline- वर जाऊन ऑफलाइन ई आधार डाऊनलोड करावे लागेल.
3- डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला XML आणि शेअर कोड दोन्ही उपलब्ध होते. त्यानंतर पुढच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला एक फॉर्म दिसेल. यामध्ये ची माहिती भरायला सांगितले असेल ती व्यवस्थित भरावी.
5- त्यानंतर तुमच्या फोनवर आणि ईमेल आयडीवर यूजर पासवर्ड येईल. त्यानंतर तुम्ही या आयडी पासवर्ड च्या द्वारे आधार टेस्टिंग आणि सर्टिफिकेशन च्या पोर्टलवर सहजतेने लॉगिन करू शकतात.
6- यानंतर तुम्हाला तुमच्या समोर कंटिन्यू विकल्प येईल. त्यावर क्लीक करून पुढे जावे.
7- पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला एक फॉर्म दिसेल तोही व्यवस्थित करावा. त्यानंतर तुमचा फोटो आणि डिजिटल स्वाक्षरी वेबसाईटवर अपलोड करावी. त्यानंतर तुम्ही दुसऱ्यांना व्यवस्थित तपासून घ्यावी की तुमची सगळी माहिती बरोबर आहे कि नाही. त्यानंतर प्रोसेस टू सबमिट फॉर्म वर क्लिक करून पुढे जावे. त्यानंतर तुम्हाला पेमेंट पॅड करावी लागते. त्यासाठी तुम्हाला वेबसाईड मधील मेनू मधील पेमेंट या विकल्प वर जाऊन क्लिक करावी. हो पेमेंट पॅड करावे. त्यानंतर प्लीज क्लिक हेअर टू जनरेट रिसिप्ट वर क्लिक करून पेमेंट ची पावती घ्यावी.
Published on: 12 December 2020, 12:58 IST