News

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही सरकारच्या अनेक यशस्वी योजनांपैकी एक आहे. आपल्याला माहित आहेच की, या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येतात.

Updated on 30 April, 2022 9:13 AM IST

 पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही सरकारच्या अनेक यशस्वी योजनांपैकी एक आहे. आपल्याला माहित आहेच की, या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येतात.

महत्वाच्या अशा या योजनेमध्येसरकारने बरेच बदल केले आहेत.आतापर्यंत जवळजवळ या योजनेच्या माध्यमातून दहा हप्ते शेतकऱ्यांना दिले गेले असून अकरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना दिल्या जाण्याची अपेक्षा आहे. पण आता  जर पी एम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी ई-केवायसी सक्तीची केली आहे. अजूनही बऱ्याच जणांना ही प्रक्रिया कशी करायची हे माहिती नाही. मधल्या काही काळामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून मोबाईल वरून ई केवायसी करता येण्याची सुविधा बंद करण्यात आली होती. मात्र पुन्हा ही सेवा मोबाईलवर सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर मोबाईलवरून ई केवायसी करून घेणे आवश्यक आहे. तुम्ही अगदी घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून हे काम आधार ओटीपी च्या माध्यमातून सहज रित्या पूर्ण करू शकतात.  सर्व शेतकऱ्यांनी ई-केवायसी ची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी कृषी मंत्रालय प्रयत्नशील असून त्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून एक मोहीम देखील सुरू करण्यात आली होती. तसेच ई केवायसी करून घेण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत असून 31 मे 2022 ची शेवटची मुदत असून तोपर्यंतशेतकऱ्यांनी ही प्रक्रिया करून घ्यायचे आहे.

 अशा पद्धतीने करा तुमच्या मोबाईलवरून '-केवायसी'

1- यासाठी सर्वप्रथम गुगल वर जाऊन Krushikranti.com या संकेतस्थळावर जावे.

2-यामध्ये सर्वात शेवटी पी एम किसान योजना आणि ई-केवायसी असे दोन पर्याय आहेत.यापैकी ई-केवायसी हा पर्याय निवडायचा आहे.

3- त्यानंतर पी एम किसान योजनाअशा आशयाचे एक नवीन पेज ओपन होते.मध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे.

4- आधार क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या उजव्या बाजूच्या इमेज मधील अक्षरे रिकाम्या जागी भरायचे आहेत व त्यानंतर सर्च करायचे आहे.

5-त्यानंतर तुमच्यासमोर आणखीन एक पेज ओपन होते. या ओपन झालेल्या पेजवर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे.

6-मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर गेट ओटीपी यावर क्लिक करायचे आहे.

7- त्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल क्रमांकावर चार अंकी ओटीपी नंबर येईलव त्यानंतर हा आलेला ओटीपी या बॉक्समध्ये टाकायचे आहे.

8- त्यानंतर submit for Auth वर क्लिक करायचे आहे व वरती ई-केवायसी इज सक्सेस असा मेसेज येईल.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:असा कसा हा खोडसाळपणा! अज्ञात माणसाने हत्याराने केले कलिंगडाचे पीक उद्ध्वस्त

नक्की वाचा:Tea Effects : चहा पिणे तुम्हालाही पसंत आहे का? मग एकदा वाचाचं चहा पिण्याने काय होतात आपल्या आरोग्यावर याचा परिणाम

नक्की वाचा:Aadhar Card : आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक आहे का? माहिती नाही मग या पद्धतीने करा चेक

English Summary: you can complete your e kyc for pm kisan samman nidhi by mobile
Published on: 30 April 2022, 09:13 IST