News

आजकाल जमिनीची खरेदी करणे अवघड होऊन बसले आहे. आजच्या काळात एकाच जमिनीचे दोन ते तीन वेळा व्यवहार झाल्याचे आपण पाहिलेले आहे.

Updated on 10 August, 2020 6:42 PM IST


आजकाल जमिनीची खरेदी करणे अवघड होऊन बसले आहे. आजच्या काळात एकाच जमिनीचे दोन ते तीन वेळा व्यवहार झाल्याचे आपण पाहिलेले आहे. एकच जमीन दोन ते तीन लोकांना विकली, अशा स्वरूपाच्या बातम्या आपण पहिल्या आहेत. त्यामुळे जमीन खरेदी करताना मोठ्या प्रमाणात काळजी घ्यावी लागते. एक सामान्य माणसाने जमीन खरेदी करण्यापूर्वी खालील गोष्टी नीट अभ्यासाव्यात

१) सात बारा : जमीन खरेदी करण्यापूर्वी चालू ७।१२ चा उतारा पाहावा. अनेकवेळा जुने उतारे दाखवले जातात. त्यामुळे जमिनीचे नेमके कितीवेळा व्यवहार झाला आहे हे कळत नाही.
२) रस्ता : जमीन बिगरशेती असेल तर रस्त्याची नकाशात नोंदणी असते. तसेच पण फक्त शेती असेल तर रस्त्यासाठी इतर शेतकऱ्यांची हरकत नाही, ना याची तपासणी करावी लागते.
३) सातबाऱ्यातील नावे : जमिनीचं सातबाऱ्यात जमिनीची विक्री करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे ना, याची खातरजमा करावी.
४) आरक्षण : तुम्ही घेत असलेल्या जमिनीवर कोणतेही आरेखन नाही ना, याची माहिती घ्यावी. उदा. वन आरक्षण, विकासकामांसाठी असलेलं आरक्षण.
५) वहिवाटदार : बऱ्याच वेळा मालक एक आणि कसणारा दुसरा असं प्रकरण असू शकत, त्यामुळे खरेदी करताना वहिवाटदार आणि मालक कोण आहे याची माहिती करून घ्यावी.
६) बोजा : सदरील जमिनीवर कर्ज ( बोजा) आहे का, जमीन कुणाकडे गहाण आहे का हे पाहावे. त्यासाठी तुमच्या वकिलाचा सल्ला घ्यावा.
७) चतुर्सिमा पाहाव्यात : जमिनीची खरेदी करताना, चतुर्सिमा पाहाव्यात. जमिनीची निश्चित हद्द पाहावी. नाहीतर तर तुम्हाला शेजारील शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागेल.
८) जमिनीचे संपादन : तुम्ही खरेदी करत असलेली जमीन कोणत्या विकासकामासाठी संपादित झालेली नाही ना याची खातरजमा करावी. त्यानंतर त्यानंतरच जमिनीची खरेदी करावी.

English Summary: you are buying land; then take care these things
Published on: 10 August 2020, 06:41 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)