News

आज 21 जून म्हणजे जागतिक योग दिवस. या दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन वर्ल्ड वन हेल्थ असा नारा दिला. भारताने या दिनाच्या निमित्ताने जागतिक आरोग्य संघटना सोबत मिळून MYoga ऍप तयार केला आहे. या ॲपच्या माध्यमातून जगभरातील लोकांना वेग वेगळ्याभाषांमधून योगा शिकता येणार आहे.

Updated on 21 June, 2021 12:02 PM IST

 आज 21 जून म्हणजे जागतिक योग दिवस. या दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन वर्ल्ड वन हेल्थ असा नारा दिला. भारताने या दिनाच्या निमित्ताने जागतिक आरोग्य संघटना सोबत मिळून MYoga ऍप तयार केला आहे. या ॲपच्या माध्यमातून जगभरातील लोकांना  वेग वेगळ्याभाषांमधून योगा शिकता येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगदिनेश जनतेला संबोधित करताना म्हटलं की,तेव्हा भारताने संयुक्त राष्ट्रातआंतरराष्ट्रीय योग दिनाच्या प्रस्ताव ठेवला होता तेव्हापुर्ण जगाला योगा सहजपणे माहिती व्हावा हीच भावना होती. या ॲपच्या मदतीने जगाला योगाची ओळख जवळून होणार आहे. या ॲपमध्ये कॉमन योगा प्रोटॉकल आधारावर  योग प्रशिक्षण देणारे व्हिडिओ जगातील वेगवेगळ्या भाषांमध्ये असतीलअसे मोदींनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार योगाची माहिती फ्रेंच, इंग्लिश, हिंदी संयुक्त राष्ट्राचे भाषेमध्येयेत्या काही महिन्यात उपलब्ध होणार आहे

.हे ॲप एकदम सुरक्षित असून युजर चा कोणताही डेटा यातून घेतला जात नाही. यासंदर्भात डब्लू एच ओ ने म्हटलं की, या ॲपच्या माध्यमातून  बारा ते 65 वर्षे वयोगटातील व्यक्तीयोगा शिकू शकतात.

 यावर्षीच्या योग दिनाची थीम योगा फोर वेलनेस आहे. योग दिनाच्या शुभेच्छा देताना मोदींनी ट्विटरवरुन म्हटलं की, योगा फोर वेलनेस मुळेशारीरिक आणि मानसिक आरोग्य तंदुरुस्त राहण्यास मदत होते. 

आजार असेल तर ते शोधा त्यांच्या मुळापर्यंत जा आणि त्याचा उपचार निश्चित करा असं महात्म्याने सांगितला आहे. कोरोना च्या या संकटात योगाचा इम्युनिटी वर होणारा सकारात्मक परिणाम वर संशोधन सुरू आहे. कोरोना काळात योग करणे गरजेचे असल्याचे मोदींनी सांगितले.

English Summary: yoga app
Published on: 21 June 2021, 12:02 IST