News

ओडिशा आणि पश्चिम बंगालला झोडपून काढणाऱ्या यास चक्रीवादळाचा (Yaas Cyclone) फटका महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता आहे. या वादळाच्या परिणामामुळे आगामी दोन-तीन दिवसांत राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

Updated on 27 May, 2021 11:12 PM IST

ओडिशा आणि पश्चिम बंगालला झोडपून काढणाऱ्या यास चक्रीवादळाचा  (Yaas Cyclone) फटका महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता आहे. या वादळाच्या परिणामामुळे आगामी दोन-तीन दिवसांत राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. (

यास चक्रीवादळाने बिहारच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर त्याचे रुपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात झाले आहे. त्याचा प्रभाव हा शेजारच्या चार राज्यांवर जाणवणार आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, नांदेड,लातूर अकोला, अमरावती, जालना या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. 

यास चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भात येत्या २४ तासांत पावसाच्या हलक्या सरी आणि सोसाट्याचा वारा वाहू शकतो. यास चक्रिवादळ ओडिशातून, झारखंड, बिहार, छत्तीसगडच्या काही भागांत धडकण्याची शक्यता आहे.  दरम्यान, झारखंडच्या सीमेत वादळाने प्रवेश केला असून चक्री वादळाची गती कमी  झाल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. छत्तीसगडलगतच्या गोंदिया, गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांमध्ये यासचा सौम्य प्रभाव पडू शकतो. या भागात तासी 140 ते 150 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तविला आहे.

 

काही दिवसांपूर्वीच अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे कोकण आणि गुजरात परिसरात प्रचंड नुकसान झाले होते. हे चक्रीवादळ कोकण आणि मुंबई किनारपट्टीच्या भागातून गेल्यामुळे मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहताना पाहायला मिळाले होते. त्यामुळे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड भागातील अनेक घरांची पडझड झाली. तसेच काही दुर्घटनांमध्ये लोकांनी आपला जीवही गमावला होता.

English Summary: Yaas Cyclone: Maharashtra will also be hit by 'Yaas'; Heavy rains expected in eight districts for next three days
Published on: 27 May 2021, 10:56 IST