News

यवतमाळ : विदर्भातील कापासाला पर्यायी पीक म्हणून नावारुपास आलेल्या सोयाबीनचे गेल्या आठ वर्षात पहिल्यादांच प्रतिक्किंटल दर हजार ९५५ रुपयांवर पोहोचला आहे. शेतकऱ्यांकडे अवघे २० ते २५ टक्के सोयाबीन शिल्लक असल्याने हे दर कमी होण्याची शक्यता नसून उलट साडेपाच हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

Updated on 24 February, 2021 4:01 PM IST

यवतमाळ : विदर्भातील कापासाला पर्यायी पीक म्हणून नावारुपास आलेल्या सोयाबीनचे गेल्या आठ वर्षात पहिल्यादांच प्रतिक्किंटल दर हजार ९५५ रुपयांवर पोहोचला आहे.

शेतकऱ्यांकडे अवघे २० ते २५  टक्के सोयाबीन शिल्लक असल्याने हे दर कमी होण्याची शक्यता नसून उलट साडेपाच हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सोयाबीनचे एकीकडे उत्पादन घटले आहे, तर दुसरीकडे जागतिक बाजारात मागणीमध्ये दीडपट वाढ झाली आहे. जागतिक बाजारातील सोयाबीनचा दर ९०० रुपये सेंटवरुन १४०० रुपयांवर पोहोचला आहे. उत्पादन घटल्याने सोयाबीन तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. कुक्कुटव्यवसायातील  खाद्य सोयाबीनच्या रॉ मटेरिअलपासून बनविले जाते.

 

देशात कुक्कुट व्यवसाय वाढला असून हा व्यवसाय ३० टक्क्यांवरुन वाढून ६०टक्क्यांवर पोहोचला आहे.पर्यायाने कुक्कुट पालन व्यवसायतील खाद्याची मागणीही त्याचपटीने वाढली आहे. सर्व बाबींचा परिणाम सोयाबीनचे दर वाढण्यावर झाला आहे. सध्या सोयाबीनला प्रतिक्किंटल ३८०० ते ४९५५ एवढा दर बाजारात आहे.

 

यापूर्वी २०१२ मध्ये हा दर साडेपाच हजारांवर गेला होता. त्यानंतर आठ वर्षांनी आता एवढ्या मोठ्या प्रमाणात सोयाबीनची दरवाढ झाली असल्याचे वृत्त लोकमत या पोर्टलने दिले आहे.शेतकऱ्यांकडे अजूनही २० ते २५ टक्के सोयाबीन शिल्लक आहे. बाजारातील तेजीचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असे मानले जाते.

English Summary: Wow! For the first time in eight years, the price of soybean is around Rs 5,000
Published on: 17 February 2021, 08:16 IST