1. बातम्या

व्वा! आठ वर्षात पहिल्यांदाच सोयाबीनचे दर पाच हजाराजवळ

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
सोयाबीनचा बाजारभाव गेला ४ हजारांवर

सोयाबीनचा बाजारभाव गेला ४ हजारांवर

यवतमाळ : विदर्भातील कापासाला पर्यायी पीक म्हणून नावारुपास आलेल्या सोयाबीनचे गेल्या आठ वर्षात पहिल्यादांच प्रतिक्किंटल दर हजार ९५५ रुपयांवर पोहोचला आहे.

शेतकऱ्यांकडे अवघे २० ते २५  टक्के सोयाबीन शिल्लक असल्याने हे दर कमी होण्याची शक्यता नसून उलट साडेपाच हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सोयाबीनचे एकीकडे उत्पादन घटले आहे, तर दुसरीकडे जागतिक बाजारात मागणीमध्ये दीडपट वाढ झाली आहे. जागतिक बाजारातील सोयाबीनचा दर ९०० रुपये सेंटवरुन १४०० रुपयांवर पोहोचला आहे. उत्पादन घटल्याने सोयाबीन तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. कुक्कुटव्यवसायातील  खाद्य सोयाबीनच्या रॉ मटेरिअलपासून बनविले जाते.

 

देशात कुक्कुट व्यवसाय वाढला असून हा व्यवसाय ३० टक्क्यांवरुन वाढून ६०टक्क्यांवर पोहोचला आहे.पर्यायाने कुक्कुट पालन व्यवसायतील खाद्याची मागणीही त्याचपटीने वाढली आहे. सर्व बाबींचा परिणाम सोयाबीनचे दर वाढण्यावर झाला आहे. सध्या सोयाबीनला प्रतिक्किंटल ३८०० ते ४९५५ एवढा दर बाजारात आहे.

 

यापूर्वी २०१२ मध्ये हा दर साडेपाच हजारांवर गेला होता. त्यानंतर आठ वर्षांनी आता एवढ्या मोठ्या प्रमाणात सोयाबीनची दरवाढ झाली असल्याचे वृत्त लोकमत या पोर्टलने दिले आहे.शेतकऱ्यांकडे अजूनही २० ते २५ टक्के सोयाबीन शिल्लक आहे. बाजारातील तेजीचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असे मानले जाते.

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters