News

दरवर्षी २२ मार्च हा दिवस 'जागतिक जल दिन' म्हणून साजरा केला जातो.

Updated on 22 March, 2022 4:27 PM IST

दरवर्षी २२ मार्च हा दिवस 'जागतिक जल दिन' म्हणून साजरा केला जातो.

संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच UNO च्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला ‘वर्ल्ड वॉटर डे’ साजरा केला. तेव्हा पासून दरवर्षी, युनोच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची प्रथा आहे.

 पाण्याची गरज नाही असे कोणतेच क्षेत्र आढळणार नाही. परंतु, एकंदरीत पाण्याचा अविचारी, आयोग्य आणि अतिवापर होत असल्याचे काही दशकांपूर्वी जाणवले. गोड्या म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पुरेसे पाणी मिळवण्यासाठी तिसरे महायुध्द होण्याची शक्यता वर्तवली जाते इतके त्याचे महत्त्व आहे !

जगभरातील सर्व ठिकाणी 22 मार्च रोजी जागतिक जलदिन साजरा केला जातो. 1 993 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेद्वारे हा दिवस दरवर्षी साजरा करण्याचा ठरण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोहिमेची घोषणा दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जलदिन म्हणून करण्यात येणार आहे. लोकांमध्ये पाणी, पाणी आणि गरजांची जाणीव याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली.

मूळ संकल्पना व सुरुवात
संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युएनओच्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला ‘वर्ल्ड वॉटर डे’ साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी, युनोच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची प्रथा आहे. उदा.२०१५ ची संकल्पना होती पाणी व शाश्वत विकास- कारण पाण्याच्या अविचारी वापराने खरा विकास न होता आपले जीवन भकास होईल. 
-तहान लागल्यावर विहीर खणू लागल्याने पश्न सुटत नाही. त्यासाठी या बाबींकडे सर्वांचेच सतत लक्ष असले पाहिजे-
-पाण्याचा योग्य आणि आवश्यक तितकाच वापर करणे.
पाण्याचा स्रोत प्रदूषित न करणे.
जगात गोड्या पाण्याच प्रमाण मुळातच फार कमी आहे.

पिण्याचे पाणी सर्वांनाच गरजेप्रमाणे मिळेल हे पाहणे

साधी तरीही अत्यंत महत्त्वाची कृती

 स्वत: ला खरोखरी किती पाण्याची गरज आहे हे समजून घेऊन तितकेच पाणी प्रत्येकाने वापरले आणि या मुद्याचा प्रसार केला तरी खूप काही साधेल!

पाण्याशी संबंधित प्रश्‍न नेमके कोणते ?

पाण्याकडे पाहण्याची मानसिकता कशी बदलता येईल?

 पावसाच्या पध्दतीत होणार्‍या बदलांची नोंद घेवून पाण्याची साठवणूक कशी करता येईल?

भूजलाची घसरती पातळी कशी थांबविता येईल?

नद्यांचे बारमाहीकरण कसे करता येईल?

तलावांवरील आक्रमण थांबवून त्याचे संवर्धन कसे करता येईल? पाण्याचे वाढते दुर्भिक्ष लक्षात घेवून त्याचा पुनर्वापर कसा करता येईल? पाण्याच्या वाढत्या प्रदूषणाला आळा कसा घालता येईल? 

पाण्याचा अधिक उत्पादक पध्दतीने वापर कसा वाढविता येईल? पाणी वितरणाचे व्यवस्थापन कसे सुधारता येईल? पाण्याचे सरकारीकरण कसे थांबविता येईल?

आपली भूमिका काय ?

स्वत: ला खरोखर किती पाण्याची गरज आहे? हे समजून घेऊन तितकेच पाणी प्रत्येकाने वापरले पाहिजे. 

 पाण्याचा स्रोत प्रदूषित न करणे. कुणी करत असेल तर त्याचा प्रतिकार करणे. 

लक्षात घ्या, ‘जल है तो, जीवन है’! प्रत्येक गोष्टीसाठी पाणी हे लागतेच. पाण्याचा वापर करणे आपण थांबवू शकत नाही. पण पाण्याच्या सुयोग्य वापरामुळे आपण पाणी वाचवू शकतो ऊद्याची तहान भागवण्यासाठी.

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

English Summary: World water day special 22 March know about in detail
Published on: 22 March 2022, 04:25 IST