News

तुम्हाला चिऊ ताऊची गोष्ट आठवते का? हो, अगदी तीच चिऊ ताऊ, चिऊ ताऊ दार उघड, अगदी बरोबर. आपण लहानपणी आजी-आजोबाकडून ही गोष्ट आपण नक्कीच ऐकली असेल. लहानपणी गोष्ट ऐकल्यानंतर आपल्याला आपोआपच चिऊ ताईविषयी प्रेम आणि आपुलकी वाटू लागते.

Updated on 20 March, 2020 2:20 PM IST


तुम्हाला चिऊ ताईची गोष्ट आठवते का?  हो, अगदी तीच चिऊ ताऊ, चिऊ ताऊ दार उघड, अगदी बरोबर. आपण लहानपणी आजी-आजोबाकडून ही गोष्ट आपण नक्कीच ऐकली असेल. लहानपणी गोष्ट ऐकल्यानंतर आपल्याला आपोआपच चिऊ ताऊविषयी प्रेम आणि आपुलकी वाटू लागते. पण आपल्या कथेत पक्क्या घरात राहणारी चिऊ आता आपले घरटे सोडून गेली आहे. हो, चिमण्यांची प्रजाती आता नष्ट होत आहे. चिमण्यांना वाचवण्यात यावे, यासाठी अनेक स्थानिक पासून ते जागतिक संघटना या चिऊ ताऊला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत.  

आज २० मार्च हा दिवस आपल्या चिऊ ताऊचा. नेहमी आपल्याला दिसणारी चिऊ ताऊ आता गायब होताना दिसत आहे. चिमण्याची संख्या का कमी होत आहे याचा अभ्यास केला जात आहे.  भारतातील नाशिकमधील नेचर फॉरएव्हर सोसायटी या चिमण्यांची संख्या कमी का होत आहे, यावर काम करत आहे.  काही वर्षांपूर्वी चिमण्यांची संख्या कमी झाल्याबद्दल मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त करण्यात आली. त्यातूनच जागतिक चिमणी दिन साजरा करण्यास प्रारंभ झाला. ही संख्या वाढावी म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणारे कार्यक्रम राबिवण्यात आले.  चिमण्याची संख्या का कमी झाली यास कोणते कारणे कारणीभूत आहेत,  याचा अभ्यास अनेक संघटना करत आहेत.

भारतात पाच प्रकारच्या प्रजाती आढळून येतात.  ज्या चिमण्या आढळून येतात त्यांना हाऊस स्पॅरो म्हणून संबोधले जाते. परंतु कोणतीच लेखी नसल्याने किंवा नोंदणी नसल्याने इतर प्रजातीची माहिती उपलब्ध नाही.  भारतासह अनेक देशातून या चिमण्या गायब होत असून त्यांना लाल यादीत टाकण्यात आले आहे. अंत्यत कमी संख्या पाहून दिवंगत नेत्या दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी दिल्लीचा राज्य पक्षी चिमणी असेल अशी घोषित केले होते.  २०१२ मध्ये अधिकृत पणे चिमणीला राज्य पक्षी घोषित करण्यात आले.  दरम्यान नाशिकच्या नेचर फॉरएव्हर सोसायटीच्या प्रयत्नामुळे जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो.

English Summary: world sparrow day ; why become sparrow delhi state bird
Published on: 20 March 2020, 11:50 IST