News

डाळींचा आहारातील वापर व त्यामुळे लोकांचे आरोग्य मध्ये होणारी सुधारणा या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी संघटनेने जागतिक डाळी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.हा दिवस दरवर्षी 10 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो.

Updated on 10 February, 2022 12:47 PM IST

डाळींचा आहारातील वापर व त्यामुळे लोकांचे आरोग्य मध्ये होणारी सुधारणा या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी संघटनेने जागतिक डाळी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.हा दिवस दरवर्षी 10 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो.

या दिवशी संपूर्ण जगाला डाळ उत्पादक पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहित केले जाते  व त्यासोबतच डाळींचे आरोग्य विषयी महत्व तसेच त्यातील पोषक घटक याविषयी जनजागृती केली जाते.

 या दिवसाचे उद्दिष्ट

 शाश्वत अन्न उत्पादनाचा भाग म्हणूनडाळींच्या पौष्टिक आणि पर्यावरणीय फायदा विषयी जनजागृती वाढविणे.

डाळींचे  फायदे

  • जमिनीची सुपीकता सुधारण्यास डाळीतील नायट्रोजन फिक्सिंग गुणधर्म उपयुक्त
  • शेत जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी आवश्यक
  • आंतरपीक व पिकांसाठी कडधान्य वापरून शेतकऱ्यांकडून जैवविविधता आणि माती जैवविविधतेस प्रोत्साहन
  • हवामान बदल शमन कार्यामध्ये डाळींचे एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

 जमिनीत कृत्रिम रित्या नायट्रोजन चा वापर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम खतांवरील अवलंबन कमी करण्यास मदतशीर

या दिवसाची ऐतिहासिक पार्श्वभूमी

  • महत्वपूर्ण घोषणा- डिसेंबर 2013 मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेकडून घोषणा
  • ठराव मंजूर- 2016 डाळींच्या आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्याचा ठराव.
  • उद्देश- डाळीचे महत्व व मूल्य ओळखणे.
  • जागतिक डाळ दिवसाची घोषणा- 2019 मध्ये UNGA कडून 10 फेब्रुवारी हा जागतिक डाळी दिवस म्हणून घोषित.

डाळींच्या आहारातील महत्व

 तसे पाहायला गेले तर भारतीय डाळी या सुपर फूड आहेत. डाळी ह्या मिनरल चा उत्तम आणि महत्त्वपूर्ण स्त्रोत आहेत. यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. लिव्हर स्टोन, पित्ताशयात होणारे खडे हे आजार टाळण्यासाठी डाळी महत्त्वाचे ठरतात. डाळी व कडधान्ये ही प्रथिनांनी  समृद्ध असतात. 100 ग्रॅम कडधान्य मध्ये 17 ते 25 टक्‍क्‍यांपर्यंत प्रथिने असतात. याला अपवाद म्हणजे सोयाबीन यामध्ये प्रथिनांचे प्रमाण 40 ते 42 टक्के असते. शाकाहारी लोकांच्या आहारामध्ये प्रथिनांची पूर्तता प्रामुख्याने कडधान्य आतूनच होते.

आपल्या भारतीय आहारात डाळी यांचा समावेश अवश्य होतो. त्यामधून भरपूर प्रमाणात प्रोटिन्स मिळतात.  आपण जेवणाची सुरुवात झाल्यापासून करतो तो वरण-भात आपल्या भारतीय आहार अत्यंत परिपूर्ण आहे त्याचबरोबर डाळ कचोरी, पुरणपोळी, इडली डोसा हे व असे अनेक  पदार्थ देखील डाळिंब पासून बनवलेले असतात तसेच ते खायला अत्यंत चविष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

English Summary: world pulses day today that express importants of pulses in health
Published on: 10 February 2022, 12:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)