आज ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्सपो सेंटर आणि मार्टमध्ये जागतिक दूध व्यवसाय शिखर परिषद 2022 होणार असून या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ही परिषद चार दिवस चालणार असून 12 ते 15 सप्टेंबर हा कालावधीत शिखर परिषद होणार आहे. या परिषदेमध्ये या क्षेत्रातील तज्ञ शेतकरी आणि धोरणकर्ते तसेच उद्योजक उपस्थित राहणार आहेत.
ही परिषद पोषण आणि उपजीविकेसाठी दुधाचा व्यवसाय या संकल्पनेवर आधारित असून यामध्ये जगभरातील 50 देशातील सुमारे 1500 तज्ञ सहभागी होण्याची शक्यता आहे. अशी शिखर परिषद 1974 नंतर दुसर्यांदा भारतात होत आहे.
नक्की वाचा:सरकारच्या या निर्णयामुळे तांदळाचे भाव राहणार स्थिर, मात्र सरकारला जास्त फायदा नाही
या शिखर परिषदेचा उद्देश
जर आपण भारताचा विचार केला तर गेल्या आठ वर्षांमध्ये दुधाच्या उत्पादनात 44 टक्क्यांपेक्षा जास्तची वाढ झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली असून एकूण जागतिक दूध उत्पादनापैकी भारताचा वाटा 23 टक्के आहे. भारतात प्रतिवर्ष दोनशे दहा दशलक्ष टन उत्पादन होते.
भारतातील जवळजवळ आठ कोटी पेक्षा जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांना सक्षम बनवणारी या भारतीय दूध उद्योगाची यशोगाथा जागतिक दूध व्यवसाय शिखर परिषद 2022 मध्ये सर्वांसमोर सादर केली जाणार असून या शिखर परिषदेच्या माध्यमातून भारतातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना जगातील दूध उत्पादनातील सर्वोत्तम पद्धती समजून घेण्यास मदत होईल अशी देखील माहिती देण्यात आली आहे.
यासोबतच भारतातील दूध व्यवसायाला चालना देण्याचा देखील प्रयत्न या माध्यमातून होणार आहे. एवढेच नाही तर या क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचा संदर्भात देखील चर्चा होणार आहे.
Published on: 12 September 2022, 10:09 IST