News

दूध हा एक जीवनावश्यक घटक मानला जातो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच दूधाची आवश्यकता असते. पाण्यानंतर कदाचित अधिकृतरित्या प्यायला जाणारा दूध हाच एकमेव पदार्थ असावा.

Updated on 01 June, 2020 4:28 PM IST

दूध हा एक जीवनावश्यक घटक मानला जातो.  लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच दूधाची आवश्यकता असते.  पाण्यानंतर कदाचित अधिकृतरित्या प्यायला जाणारा दूध हाच एकमेव पदार्थ असावा. दुधातून आपल्याला कॅल्शियम मॅगनिशियम,झिंक, फॉस्फरस,ऑयोडीन, आयर्न, पोटॅशियम, फोलेट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी12, प्रोटीन, हे घटक मिळत असतात.  दूध हा अधिक ऊर्जा देणारा पदार्थ आहे. दूध प्यायल्याने मानवी शरीरात कमी वेळात जास्त उर्जा उत्पन्न होऊ शकते. कारण, दुधात अधिक मात्रेत प्रोटीन असते.

आरोग्यासाठी लाभकारक असलेल्या दुधाचा आज महत्त्वाचा दिवस आहे. संयुक्त राष्ट्रकडून (United Nation) आज १ जून हा  दिवस जागतिक दूग्ध दिवस म्हणून साजरा केला जातो.  अनेक देशांमध्ये याच तारखेला दुग्ध दिवस साजरा केला जात असे.  सर्वासामान्य नागरिकांना दूधाबद्दल माहिती कळावी आणि जगभराती देशांना दुधाचे महत्त्व ध्यान्यात यावे यासाठी हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला.  प्रत्येक वर्षी दुग्ध दिवसाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र द्वारे एक थीम निश्चित केली जाते.  या थीमचं एकच उद्देश असतो तो म्हणजे सर्व नागरिकांपर्यंत दूध सहजपणे पोहाचवं आणि सर्वासामान्य नागरिकांना दुधाबद्दल माहिती कळावी आणि जगभराती देशांना दुधाचे महत्त्व ध्यान्यात यावे. 

आधी हा दिवस इतर कार्यक्रमाच्या आधारे साजरा केला जात, म्हणजे मॅरेथॉन, शाळेतील कार्यक्रम यातून हा दिवस साजरा केला जात.  वर्ष २००१ मध्ये हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली. याची सुरुवात संयुक्त राष्ट्राच्या खाद्य विभाग आणि कृषी संघटनानांकडून करण्यात आली होती.  मागील वर्षी दुग्ध दिवसात ७२ देशांनी सहभाग घेतला होता. या देशांमध्ये साधारण ५८६ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  भारतात १ जून दुग्ध दिवस आणि २६ नोव्हेंबरला राष्ट्रीय दुग्ध दिवस साजरा केला जातो.  कारण याच दिवशी १९२१ मध्ये धवलक्रांती आली होती.  जगभरातील अनेक देश दूध उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारतातही धवलक्रांती म्हणजेच दूध वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य सरकारच्या माध्यमातून केले जाते.

English Summary: World Milk Day: today's date is important day to milk
Published on: 01 June 2020, 04:24 IST